‘बीसीसीआय’ची ‘आयपीएल’ प्रक्षेपण हक्काद्वारे पाच अब्ज डॉलर्सची कमाई?

मागील प्रक्षेपण हक्काच्या शर्यतीत स्टार इंडिया आणि सोनी हे दोनच मोठे स्पर्धक होते.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या (आयपीएल) पुढील पाच वर्षांसाठीच्या (२०२३-२०२७) प्रक्षेपण हक्काद्वारे (टीव्ही आणि डिजिटल) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुमारे पाच अब्ज डॉलर्सची कमाई करता येऊ शकते.

सध्याचे (२०१८-२०२२) ‘आयपीएल’ प्रक्षेपण हक्क स्टार इंडियाकडे आहेत. सध्याचे या हक्कांचे मूल्य २.५५ अब्ज (१६,३४७.५० कोटी रुपये) आहेत. आगामी हंगामापासून ‘आयपीएल’मध्ये आणखी दोन संघ वाढणार असल्यामुळे सामन्यांची संख्या ७४ होणार आहे. त्यामुळे प्रक्षेपण हक्काद्वारे पाच अब्ज डॉलर (३६ हजार कोटी रुपये) ‘बीसीसीआय’च्या खात्यात जमा होऊ शकतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. आगामी प्रक्षेपण हक्क शर्यतीत एका नामांकित परदेशी प्रक्षेपण कंपनीनेही उत्सुकता दर्शवली आहे. येत्या काही दिवसांत ‘आयपीएल’मधील दोन संघांचा लिलाव होणार असून, प्रत्येक संघ ७ हजार ते १० हजार कोटी रुपयांना विकला जाण्याची शक्यता आहे. मागील प्रक्षेपण हक्काच्या शर्यतीत स्टार इंडिया आणि सोनी हे दोनच मोठे स्पर्धक होते. दुबईत २५ ऑक्टोबरला ‘आयपीएल’मधील दोन नव्या संघांची घोषणा होणार असून, याच वेळी ‘बीसीसीआय’कडून निविदा प्रक्रिया जारी करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bcci could earn up to usd 5 billion from ipl broadcasting rights zws

ताज्या बातम्या