IPL 2020चे आयोजन UAEमध्ये करण्यासाठी BCCIने अमिराती क्रिकेट बोर्डला (ECB) एक स्वीकृती पत्र पाठवले आहे. IPLचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी रविवारी या माहितीला दुजोरा दिला. “आम्ही एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला स्वीकृतीपत्र पाठवले आहे आणि दोन्ही मंडळे आतापासून या स्पर्धेसाठी एकत्र काम करणार आहेत,” असे पटेल यांनी सांगितल्याचे वृत्त खलिज टाईम्सने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, करोनाने जगाला हादरवून टाकल्यानंतर ECBने एप्रिलमध्येच IPL 2020च्या आयोजनाचा प्रस्ताव पाठवला होता. पण २९ मार्चपासून सुरु होणारे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता सप्टेंबर १९ पासून IPL सुरू होणार आहे. आठही संघ आपल्या संघाचे हंगामपूर्व प्रशिक्षण शिबीर UAEमध्येच आयोजित करतील अशी माहितीही पटेल यांनी दिली. ही शिबीरं bio-secure वातावरणात होतील. किमान तीन-चार आठवडे आधी सर्व खेळाडू संघासोबत सराव सुरू करतील.

BCCIच्या या स्वीकृती पत्रानंतर आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष भारत सरकारच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे. यंदा लीग भारताबाहेर आयोजित करण्याचे ठरले असले, तरी अंतिम निर्णय गृहमंत्रालय देणार आहे. पण मंत्रायलकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम रंगेल. सर्व संघांना सराव करता यावा यासाठी संघमालक महिनाभर आधी युएईत दाखल होण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व संघांमध्ये महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ (CSK) ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच युएईसाठी रवाना होणार असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci sends acceptance letter to emirates cricket board says both boards work together to host ipl 2020 in uae vjb
First published on: 27-07-2020 at 11:13 IST