टोक्यो ऑलिम्पिकच्या शनिवारी १५व्या आणि अखेरच्या दिवशी नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर कुस्तीपटू बजरंग पुनियाने कांस्यपदकाची कमाई केली आहे. नीरजने ऐतिहासिक सुवर्णपदकासह भारताची पदकसंख्या सातपर्यंत नेली. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांचा विक्रम भारताने यंदा मोडीत काढला. दरम्यान, नीरज चोप्रा आणि बजरंग पुनिया दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोबत्या त्यांना भले मोठे बक्षिस सुद्धा देण्यात येत आहे. नीरज चोप्रा आणि बजरंग पुनिया शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठाने  मोठी घोषणा केली आहे.

लवली प्रोफेशनल विद्यापीठातने टोक्यो ऑलिम्पिकचे सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना पुरस्कार जाहीर केले आहेत. विद्यापीठात नीरज चोप्राला ५० लाख आणि बजरंग पुनियाला १० लाख रुपयांचे बक्षीस देईल. नीरज लवली प्रोफेशनल विद्यापीठामधून BA करत आहे तर पुनिया MA करत आहे.

नीरज चोप्राने १२१ वर्षांत प्रथमच अॅथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भालाफेक स्पर्धेत नीरजने हा विक्रम केला आहे. नीरजने पहिल्या फेकात भाला ८७.०३ मीटर फेकला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात नीरजने ७६.७९ मीटर दूर भाला फेकून सर्वांना आश्चर्यचकित केले.

त्याचबरोबर बजरंग पुनियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे पदक मिळवून दिले. शनिवारी त्याने ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी कुस्तीमध्ये कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोवचा ८-० असा पराभव केला. नियाजबेकोवने रेपेचेज सामना जिंकल्यानंतर या सामन्यात प्रवेश केला होता. बजरंगच्या विजयानंतर संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे.