२०३२मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजनपद मिळवण्यात ब्रिस्बेन यशस्वी झाला आहे. या यजमानपदाची जबाबदारी ब्रिस्बेनकडे जाणार, ही शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. आज बुधवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. बुधवारी मतदानानंतर ब्रिस्बेनला अधिकृतपणे यजमान म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९५६ मध्ये मेलबर्न आणि २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल ३२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले, ”आमच्या सरकारला अभिमान आहे की आम्हाला ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँड येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडची सरकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ज आहेत. आम्ही खेळ उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करू. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कसे केले जाते हे आम्हाला माहीत आहे.”

 

२०२४ मधील ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्ये आणि २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिस येथे होणार आहेत. ब्रिस्बेन नवीन बिडिंग सिस्टमचा पहिला विजेता आहे. नवीन नियमांनुसार, आयओसी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यासाठी काही बळकट देशांची निवड करते. त्यानंतर मतदानासह यजमान देश निवडला जातो.

 

हेही वाचा – “हारकर जितने वाले को…”, दीपक चहरच्या कामगिरीवर क्रिकेटपटूंनी दिल्या जबरदस्त प्रतिक्रिया

ब्रिस्बेन यजमान म्हणून घोषित होताच ऑस्ट्रेलियामध्ये बर्‍याच ठिकाणी फटाके फोडण्यास आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brisbane has been confirmed as the host city for the 2032 olympic games
First published on: 21-07-2021 at 15:02 IST