बीआरएम एन्ड्युरन्स सायकलिंग स्पर्धे दरम्यान एका युवा सायकलपटूचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाला. नोएल फॉनसेका असे या सायकलपूटचे नाव आहे. सायकलिंग स्पर्धे दरम्यान नोएलचे कार्डिअॅक अरेस्टमुळे ह्दयक्रिया बंद पडून निधन झाले. बीआरएमतर्फे हौशी सायकलपटूंसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.

एन्ड्युरन्स ही सायकलपटूंची शारिरीक क्षमतेची कसोटी पाहणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये ४०० किलोमीटरचा टप्पा होता. ज्यामध्ये स्पर्धकाला अनेक खडतर टप्पे पार करावे लागणार होते. बीआरएम गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून भारतामध्ये ही स्पर्धा आयोजित करत आहे. अनेक सायकलपटू या स्पर्धेमधून तयार झाले आहेत.