ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने मेलबर्न कसोटीतील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि १८२ धावांनी पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मेलबर्न कसोटी सामन्यादरम्यान कॅमेरून ग्रीनचे बोट फ्रॅक्चर झाले होते, ज्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही, परंतु या फ्रॅक्चरसह ग्रीनने फलंदाजी केली आणि १५७ चेंडूंचा सामना केला.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) खेळली गेलेली बॉक्सिंग डे कसोटी चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने जिंकली. त्यानंतर ग्रीनने इंस्टाग्रामवर कसोटी सामन्याचे काही संस्मरणीय फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचा फोटोही आहे. एक्स-रेमध्ये ग्रीनच्या बोटाचे फ्रॅक्चर स्पष्टपणे दिसत आहे. ग्रीनला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने नाबाद ५१ धावा करताना पाच बळी घेतले होते.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या १८९ धावांत गुंडाळले होते. प्रत्युत्तरात ८ गड्यांच्या मोबदल्यात ५७५ धावा करून डाव घोषित केला होता. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ २०४ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी मिळाली.

आता ग्रीनला तंदुरुस्त होण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. म्हणूनच तो ९ फेब्रुवारीपासून भारतात सुरू होणार्‍या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना मिस करु शकतो.

हेही वाचा – Pele Passes Away: पेलेंनी मोहन बागान विरुद्ध खेळला होता सामना; जाणून घ्या महान फुटबॉलपटूचे काय आहे भारत कनेक्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रीनच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना, चाहत्यांनी धाडसी कॅमेरून ग्रीनचे कौतुक केले आहे. तसेच टिप्पण्यांमध्ये त्याच्या हिंमतीला सलाम केला. मात्र, सध्या तरी ग्रीनला आशा असेल की त्याची शस्त्रक्रिया चांगली होईल आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी तो तंदुरुस्त होईल.