वृत्तसंस्था, टोरंटो

भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेतील आपले अपराजित्व कायम राखताना चौथ्या फेरीच्या लढतीत अग्रमानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले. नाशिककर विदित गुजराथीला मात्र सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले, तर महिलांमध्ये कोनेरु हम्पीही पराभूत झाली.

dheeraj bommadevra
भारताचे तिरंदाजी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत; मानांकन फेरीत धीरज, अंकिताची चमक
copa america 2024 final argentina vs colombia match prediction
Copa America 2024 : तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाला संधी; कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचे आव्हान
argentina beat ecuador in copa america
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : मार्टिनेझमुळे अर्जेंटिनाचे आव्हान शाबूत; इक्वेडोरला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत उपांत्य फेरीत
Virat Kohli Meets Childhood Rajkumar Sharma Coach photo viral
Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल
Coco Gough enters the third round of the Wimbledon tennis tournament
कोको गॉफची आगेकूच
England beat Slovakia to reach the quarter-finals of the Euro Football Championship sport news
अलौकिक बेलिंगहॅमने इंग्लंडला तारले! स्लोव्हाकियाला नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
Rohit Sharma takes a bite of Barbados pitch after T20 World Cup win
IND vs SA Final: रोहित शर्माने विजयानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव का चाखली? VIDEO मध्ये पाहा कॅप्टनने नेमकं काय केलं?
t20 cricket world cup final India vs south africa match preview
तुल्यबळांमध्ये वर्चस्वाची लढाई! ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम लढतीत आज भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

खुल्या विभागातील चौथ्या फेरीत, विदितला गेल्या दोन जागतिक अजिंक्यपद लढतींतील उपविजेत्या इयान नेपोम्नियाशीकडून पराभव पत्करावा लागला. विदितने ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेची सकारात्मक सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत गुकेशला बरोबरीत रोखल्यानंतर दुसऱ्या फेरीत विदितने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, त्यानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. पुढील दोन फेऱ्यांमध्ये त्याला आर. प्रज्ञानंद आणि नेपोम्नियाशी यांच्याकडून हार पत्करावी लागली आहे.

गुकेशने मात्र आपली चांगली कामगिरी सुरू ठेवताना चारपैकी तिसऱ्या सामन्यात बरोबरीची नोंद केली. तसेच त्याने दुसऱ्या फेरीत प्रज्ञानंदवर विजयही मिळवला होता. कारुआनाविरुद्ध काळय़ा मोहऱ्यांनिशी गुकेशने उल्लेखनीय खेळ केला. कारुआनाने इटालियन पद्धतीने सुरुवात केली आणि सामन्याच्या मध्यात गुकेशवर दडपण आणले. मात्र, गुकेशने संयम बाळगला. त्याने आपल्या एका प्याद्याचे बलिदान दिले आणि यानंतर त्याला कारुआनाची काही प्यादी टिपता आली. अखेरीस दोन्ही वजीर आणि काही प्यादी पटावर शिल्लक असल्याने कारुआनाला विजयाची संधी होती. परंतु गुकेशने भक्कम बचाव केला. त्यामुळे ७२ चालींअंती कारुआनाने बरोबरी मान्य केली.    

हेही वाचा >>>IPL 2024 CSK vs KKR: चेन्नईने रोखला केकेआरचा विजयरथ, ऋतुराज-जडेजाची शानदार कामगिरी

चौथ्या फेरीतील अन्य लढतींत, प्रज्ञानंदने नाकामुराविरुद्ध, तर अझरबैजानच्या निजात अबासोवने फ्रान्सच्या प्रतिभावान अलिरेझा फिरुझाविरुद्ध बरोबरीची नोंद केली. या निकालांनंतर खुल्या विभागात नेपोम्नियाशी तीन गुणांसह अग्रस्थानी पोहोचला आहे. गुकेश आणि कारुआना प्रत्येकी २.५ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत. प्रज्ञानंद दोन गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्याखालोखाल असणाऱ्या विदित, अबासोव, फिरुझा आणि नाकामुरा यांचे प्रत्येकी १.५ गुण आहेत.

महिला विभागात, भारताची ग्रँडमास्टर हम्पीला यंदाच्या स्पर्धेतील सर्वात युवा महिला बुद्धिबळपटू नुरग्युल सलिमोवाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हम्पीची पहिल्या विजयाची प्रतीक्षा कायम राहिली. हम्पीला पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. काळय़ा मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या हम्पीला सलिमोवाच्या कॅटलान पद्धतीचा सुरुवातीला सामना करावा लागला. हम्पीने डच बचावपद्धतीच्या जवळ जाणाऱ्या चाली रचून सलिमोवाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलिमोवाने हम्पीला कायम दडपणाखाली ठेवले. दोन वजिरांच्या अदलाबदलीनंतर सलिमोवाने आणखी प्यादी टिपत वर्चस्व मिळवले. अखेर हम्पीने ६२व्या चालीनंतर हार मान्य केली.

चौथ्या फेरीचे निकाल

’ खुला विभाग :

इयान नेपोम्नियाशी (एकूण ३ गुण) विजयी वि. विदित गुजराथी (१.५). हिकारू नाकामुरा (१.५) बरोबरी वि. आर. प्रज्ञानंद (२), फॅबियानो कारुआना (२.५) बरोबरी वि. डी. गुकेश (२.५ गुण), निजात अबासोव (१.५) बरोबरी वि. अलिरेझा फिरुझा (१.५).

’ महिला विभाग :

अलेक्झांड्रा गोर्याचकिना

(२.५ गुण) बरोबरी वि. आर. वैशाली (२), नुरग्युल सलिमोवा (२) विजयी वि. कोनेरू हम्पी (१.५). कॅटेरिना लायनो (२) बरोबरी वि. टॅन झोंगी (३),

अ‍ॅना मुझिचुक (१.५) बरोबरी वि. ले टिंगजी (१.५).