श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेमधील महिला संघांच्या एकदिवसीय सामन्यात ६०० अधिक धावांचा पाऊस पाहायला मिळाला. श्रीलंकेची अनुभवी सलामीवीर चामरी अट्टापट्टूने नाबाद १९५ धावांची शानदार खेळी खेळून सर्व एकदिवसीय विक्रम मोडीत काढले. तिच्या या स्फोटक खेळीच्या जोरावर श्रीलंकेने महिला वनडे इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला. श्रीलंकेने पॉचेफस्ट्रूममध्ये अवघ्या ४४.३ षटकांत ३०२ धावा करून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम सामना जिंकला. महिला क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने ३०० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.

श्रीलंकेने या विजयासह ऑस्ट्रेलियाचा दशकभरापूर्वीचा जुना विक्रम मोडला. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर २८९ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले होते. श्रीलंकेचा संघ आता विक्रमी यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

चामरी अट्टापट्टूच्या बळावर हा मोठा विक्रम श्रीलंकेने नोंदवला. त्याने केवळ १३५ चेंडूंचा सामना करताना १९५ धावांच्या खेळीत ५ षटकार आणि २९ चौकार लगावले. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डची १४७ चेंडूत नाबाद १८४ धावांच्या मेहनतीवर तिने पाणी फेरले. चामरी अट्टापट्टूची १९५ धावसंख्या ही महिला एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे आणि ५० षटकांच्या स्वरूपातील एकंदरीत दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत चामरी अट्टापट्टूच्या पुढे केवळ ग्लेन मॅक्सवेल आहे. मुंबईत झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांच्या धारदार खेळीदरम्यान एकदिवसीय सामन्यात (पुरुष आणि महिला) पाठलाग करताना अधिक धावा केल्या आहेत. चामरीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावरच श्रीलंकेने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ३०२ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य यशस्वीपणे पार केले आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.