सव्‍‌र्हिसेसच्या चंद्रकांत माळी याने वरिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ९४ किलो वजनी गटात तीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद करत तीन सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे. चंद्रकांतने स्नॅच प्रकारात १५३ किलो तर क्लिन आणि जर्क प्रकारात १९० किलो वजन उचलून एकूण ३४३ किलो वजन उचलले. त्याची ही कामगिरी राष्ट्रीय विक्रम ठरली आहे. पुरुषांच्या १०५ किलो वजनी गटात सव्‍‌र्हिसेसच्या मोहनलाल श्यामलाल याने क्लिन आणि जर्क प्रकारात १९० किलो वजन उचलून आपलाच विक्रम मागे टाकला. २००४मध्ये सुखविंदर सिंगने स्नॅच प्रकारात रचलेला १५२ किलोचा विक्रम चंद्रकांतने मोडीत काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant mali national records
First published on: 10-01-2013 at 04:26 IST