वृत्तसंस्था, चेन्नई : पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदवर मात करत चॅरिटी चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच या विजयासह कार्लसनने गेल्या महिन्यात एअरिथग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षीय प्रज्ञानंदकडून झालेल्या पराभवाची परतफेडही केली. चॅरिटी चषक स्पर्धेतील सामन्यात काळय़ा मोहऱ्यांसह खेळणाऱ्या कार्लसनने सुरुवातीपासून वर्चस्व प्रस्थापित केले. त्याला प्रत्युत्तर देणे प्रज्ञानंदला शक्य झाले नाही आणि ४३ चालींअंती कार्लसनने विजयाची नोंद केली. त्यानंतर प्रज्ञानंदने शेवटून दुसऱ्या फेरीत विश्वचषक विजेत्या यान-क्रिस्टॉफ डूडाला पराभूत करण्याची किमया साधली. मात्र अखेरच्या फेरीत त्याला स्पेनच्या डेव्हिड अॅन्टोनकडून पराभव पत्करावा लागल्याने तो बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2022 रोजी प्रकाशित
चॅरिटी चषक बुद्धिबळ स्पर्धा : कार्लसनची प्रज्ञानंदवर मात
पाच वेळा विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदवर मात करत चॅरिटी चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
Written by वृत्तसंस्था

First published on: 24-03-2022 at 01:53 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charity cup chess tournament carlson beats pragyanand entered semifinals ysh