अस्तित्व संस्कार प्रबोधिनीतर्फे चेस किंग फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीदरम्यान दहावीपर्यंतच्या शालेय बुद्धिळपटूंसाठी ही स्पर्धा असणार आहे. करी रोड स्थानकाजवळील ना.म. जोशी मार्गावरील शाळेत ही स्पर्धा रंगणार आहे. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत फिडेच्या नियमानुसार ९० मिनिटांची प्रत्येक फेरी असणार आहे.
विजेत्याला चाळीस हजारांचे बक्षीस रकमेने सन्मानित करण्यात येणार आहे. बिगरमानांकित खेळाडूंनाही दहा रोख पुरस्कारांची बक्षीसे दिली जाणार आहेत. देशभरातून पाचशेपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. शालेय बुद्धिबळपटूंच्या कौशल्याला वाव मिळावा यादृष्टीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागासाठी पुरुषोत्तम भिलारे ९८६९०१७२२१, विश्वनाथ माधव ९८२०१२१२४१ तसेच जी. नागेश ९७०२२२४४४२ या क्रमांकावर संपर्क करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess king fide chess competition
First published on: 15-12-2014 at 12:43 IST