वृत्तसंस्था, बिल : भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ली क्वँग लिएमवर विजय नोंदवत स्विर्त्झलॅड येथे सुरू असलेल्या बिल बुद्धिबळ महोत्सवातील ग्रँडमास्टर ट्रायथलॉनमध्ये अग्रस्थान मिळवले. यासह त्याने ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये  २७०० एलो गुणांचा टप्पाही पार केला. ही कामगिरी करणारा १६ वर्षीय गुकेश सर्वात युवा भारतीय, जगातील तिसरा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे.

‘लाइव्ह रेटिंग’मध्ये सामन्यातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची गुणवारी बदलत असते. त्यामुळे गुकेशने लिएमवर मात केल्यानंतर त्याला २७०० एलो गुणांचा टप्पाही पार करता आला. मात्र, आपले क्रमवारीचे गुण २७०० हून अधिक ठेवण्यासाठी गुकेशला पुढेही चांगली कामगिरी सुरू ठेवावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिल बुद्धिबळ महोत्सवातील ग्रँडमास्टर ट्रायथलॉनमध्ये गुकेशने आतापर्यंत दर्जेदार खेळ केला आहे. त्याने दहा सामन्यांत १६.५ गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. दुसऱ्या स्थानावरील लिएमचे १५ गुण, तर तिसऱ्या स्थानावरील आंद्रे एसिपेन्कोचे १४.५ गुण आहेत.