चेन्नई : महाराष्ट्राचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता भारताचा ७१वा ‘ग्रँडमास्टर’ ठरला आहे. सर्बिया येथे झालेल्या स्पर्धेत ६.५ गुणांसह दुसरे स्थान पटकावत त्याने ‘ग्रँडमास्टर’ किताबासाठी आवश्यक निकष साध्य केले.१८ वर्षीय संकल्पने २४ दिवसांत सलग तीन स्पर्धा खेळत ‘ग्रँडमास्टर’ ठरण्यासाठी तीन निकष पूर्ण केले. या तिन्ही स्पर्धात त्याने कामगिरीचे २५९९ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले. तसेच सर्बिया येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान त्याने २५०० एलो गुणांचा टप्पा गाठला. ‘ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने २५०० एलो गुण आणि तीन निकष (नॉर्म) पूर्ण करणे गरजेचे असते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2021 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राच्या संकल्पला ‘ग्रँडमास्टर’चा किताब
‘ग्रँडमास्टर’चा किताब पटकावण्यासाठी खेळाडूने २५०० एलो गुण आणि तीन निकष (नॉर्म) पूर्ण करणे गरजेचे असते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-11-2021 at 00:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess sankalp gupta becomes india s 71st grandmaster zws