श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील शतकी खेळीच्या जोरावर चेतेश्वर पुजारा आयसीसी कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धटच्या दुसऱ्या कसोटीत पुजाराने १४३ धावांची दमदार खेळी केली होती. पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा यांची शतकी खेळी आणि कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकानंतर भारताने श्रीलंकेला डावासह २३९ धावांनी पराभूत केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-श्रीलंका आणि इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आयसीसीने जारी केलेल्या क्रमवारीत पुजाराने २२ गुणांसह दोन स्थानांनी झेप घेत दुसरे स्थान पटकावले. पुजाराच्या नावे आता ८८८ गुण आहेत. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ ९४१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पुजाराशिवाय रवींद्र जाडेजाने गोलंदाजी आणि अष्टपैलू कसोटी क्रिकेटपटू म्हणून दुसऱे स्थान पटकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ८४ धावात ५ बळी टिपणाऱ्या जाडेजाने ८८० गुण मिळवले आहेत. गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने अव्वल स्थान कायम राखले. मात्र, अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत केवळ दोन विकेट्स मिळल्यामुळे त्याच्या एकूण गुणांमध्ये ५ अंकांची घसरण झाली आहे. तो ८९१ गुणांसह अव्वलस्थानी आहे.

अष्टपैलू खेळाडूच्या यादीत बांगलादेशचा शाकीब हसन ४३७ गुणांसह अव्वल स्थानी असून जाडेजा (४१४) आणि आर अश्विन ३८८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत विक्रमी ३०० बळींचा टप्पा पार करणाऱ्या अश्विनला गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ८४९ गुणासह त्याने चौथे स्थान पटकावले.  नागपूरच्या मैदानात कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकवणाऱा भारताचा कर्णधार विराटला अव्वल पाच फलंदाजामध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. कोहली ८७७ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheteshwar pujara ravindra jadeja rise to no 2 in icc test rankings
First published on: 28-11-2017 at 15:02 IST