आकांक्षा हगवणेने नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेतील मुलींच्या १६ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकले.
आकांक्षाने आठ फेऱ्यांमध्ये साडेसहा गुणांची कमाई केली. औरंगाबादच्या साक्षी चितलांगेने सहा गुणांसह दुसरे स्थान मिळवले. केरळच्या एच.मेघनाने तिसरा क्रमांक मिळविला, तर पुण्याच्या सलोनी सापळेने चौथे स्थान पटकावले. आकांक्षाने या स्पर्धेत अव्वल स्थान मिळविताना अनेक अनुभवी खेळांडूंवर मात केली. तिने पाच डाव जिंकले व तीन डाव बरोबरीत ठेवले. आकांक्षाने आतापर्यंत महेश्वरानंद सरस्वती चषक स्पर्धेसह अनेक अखिल भारतीय स्पर्धा जिंकल्या आहेत. राष्ट्रीय विजेतेपदामुळे आकांक्षाला सेऊल येथे ३ ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आशियाई युवा स्पर्धा तसेच जागतिक युवा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commonwealh chess compition akansha win gold
First published on: 02-07-2015 at 05:54 IST