भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळणाऱ्या राहुल द्रविडला बीसीसीआयने चौकशीसाठी बोलावलं आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदासोबतच द्रविड सध्या चेन्नई सुपकिंग्जचे मालक एन.श्रीनीवासन यांच्या कंपनीत मोठा हुद्द्यावर कामाला आहे. याच कारणामुळे लाभाचं पद भूषवल्याचा ठपका ठेवत बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांनी राहुलला नोटीस बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधीही राहुल द्रविडला याच प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. १२ नोव्हेंबरला या प्रकरणावर निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे तक्रार केली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष असलेला द्रविड श्रीनीवासन यांच्या इंडियन सिमेंट कंपनीत कामाला आहे. आयपीएलमध्ये श्रीनीवासन यांचा चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ खेळतो, ज्यामुळे राहुल द्रविडवर परस्पर हितसंबंध जपल्याचा ठपका आहे.

याआधीही संजीव गुप्ता यांनी सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्याविरोधात तक्रार केली होती. बीसीसीआयमध्ये नुकत्याच झालेल्या बदलांनुसार, माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे अध्यक्षपदाची सुत्र हाती आली आहेत. त्यामुळे भविष्यकाळात या प्रकरणात नेमका काय निर्णय घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict of interest bcci ethics officer asks rahul dravid to depose on november 12 psd
First published on: 31-10-2019 at 15:15 IST