भारताचा विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंद याला गेले अनेक दिवस बरोबरीची कोंडी फोडता आलेली नाही. येथे सुरू असलेल्या लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत त्याला व्लादिमीर क्रामनिकने बरोबरीत रोखले.
नॉर्वेच्या मॅग्नुस कार्लसन याने चौथ्या फेरीअखेर दहा गुणांसह आघाडी घेतली आहे. क्रामनिकने आठ गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्स तिसऱ्या स्थानावर असून त्याचे सात गुण झाले आहेत. अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याने पाच गुणांसह त्याखालोखाल स्थान मिळविले आहे. लिवॉन आरोनियन याचे चार गुण असून आनंदने आतापर्यंत केवळ तीन गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडच्या गेवेन जोन्सचे दोन गुण असून ल्युक मॅकशेनी व ज्युडिथ पोल्गार यांचा प्रत्येकी एक गुण आहे.