या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस संपूर्ण देश साजरा करत आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु, खोडसाळपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियनांनी या महान फलंदाजाला वाढदिवसाच्या दिवशी डिवचायचा प्रयत्न केला आहे. आज डॅमियन फ्लेमिंदचाही वाढदिवस आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं फ्लेमिंगचा वाढदिवस साजरा करताना त्यानं सचिन तेंडुलकरला क्लीन बोल्ड केलं होतं, तो व्हिडीयो ट्विट केला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कृत्यामुळे सचिनचे चाहते भडकले असून त्यांनी सचिननं फ्लेमिंगला मारलेल्या षटकारांचे व्हिडीयो ट्विट केले आहेत.
फ्लेमिंगनं सचिनला कसोटी व एक दिवसीय सामन्यात मिळून सात वेळा बाद केलं आहे. सगळ्यात जास्त 14 वेळा ब्रेट लीनं सचिनची विकेट घेतली आहे, तर ग्लेन मॅग्राथनं 13 वेळा व जेसन गिलेस्पनं आठ वेळा सचिनला बाद केलं आहे.

योगायोग म्हणजे आज फ्लेमिंगताही वाढदिवस असून त्यानं 48 वर्ष पूर्ण केली तर सचिननं 45 पार केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket australia gets reply from sachin tendulkars followers
First published on: 24-04-2018 at 13:28 IST