“देशावर हा मोठा आघात…”, जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर क्रिकेटविश्व हळहळलं; विराटसह अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे.

Cricket fraternity pays their respects to CDS General Bipin Rawat
बिपिन रावत यांच्या मृत्यूवर क्रिकेटविश्वातून हळहळ

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल (सीडीएस) बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या दुर्देवी घटनंतर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. रावत यांच्यासह इतर १४ व्यक्तींचेही या हेलिकॉक्टर अपघातात निधन झाले. ही घटना तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये घडली. लष्कराचे हे हेलिकॉप्टर रावत यांच्यासह इतर सहकऱ्यांना घेऊन हवेत उडाल्यानंतर तत्काळ ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेवेळी रावत यांच्या पत्नीदेखील त्यांच्यासोबत होत्या आणि त्यांचेही निधन झाले आहे.

या घटनेने क्रिकेटपटूही दुखावले. क्रिकेटविश्वातील देखील अनेक दिग्गजांनी रावत यांच्याविषयी शोक व्यक्त केला आहे.

रावत यांच्याविषयी…

लष्करी अधिकाऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आलेले आणि आपल्या काळातील सर्वाधिक प्रख्यात सैनिकांपैकी एक असलेले जनरल बिपिन रावत यांनी १ जानेवारी २०२० रोजी संरक्षण दल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ- सीडीएस) पदाची सूत्रे स्वीकारली. हे पद भूषवणारे पहिलेच अधिकारी झाल्याने ते देशाचे सर्वात मोठे लष्करी अधिकारी ठरले. सीडीएस या नात्याने जनरल रावत हे नौदल, हवाई दल आणि लष्कर यांचे नेतृत्व करणाऱ्या इतर चार तारांकित अधिकाऱ्यांचे वरिष्ठ होते. पूर्वी संरक्षण खात्याकडे असलेल्या काही जबाबदाऱ्या वेगळ्या करून तयार झालेल्या लष्करी व्यवहार खात्याचे (डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स) देखील ते प्रमुख होते. याशिवाय संरक्षम दलांशी संबंधित सर्व मुद्यांवर ते संरक्षम मंत्र्यांचे प्रधान लष्करी सल्लागार होते.

हेही वाचा – ASHES : अरे चाललंय काय..! बेन स्टोक्सनं उडवल्या वॉर्नरच्या दांड्या, तरीही मिळालं जीवदान; VIDEO समोर आला तेव्हा कळलं…

३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत लष्कराचे २७वे प्रमुख म्हणून रावत हे आनंदी व स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जात. लष्कराचे फेरसंघटन करून त्याला भविष्यातील युद्धासाठी सुयोग्य बनवण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. जनरल रावत यांना उत्तम युद्ध सेवा मंडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध९ सेवा मेडल व सेवा मेडल या पदकांसह अनेक सन्मानांनी गौरवान्वित करण्यात आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cricket fraternity pays their respects to cds general bipin rawat adn