वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांपूर्वी भारताचे क्रिकेटपटू आर. अश्विन, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध बास्केटबॉल क्लब मियामी हीट्सला भेट दिली.

मियामी हीट्सच्या काही खेळाडूंनी भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या क्लबची बातमी दिली. त्याचबरोबर क्लबमधील व्यायामशाळा, रिक्रीएशन सेंटर, लॉकर रूमही दाखवले. या वेळी अश्विन शालेय जीवनातील बास्केटबॉलच्या आठवणींमध्ये रमला. त्याचबरोबर या तिघांनी बास्केटबॉल खेळण्याचा आनंदही लुटला.

‘शालेय जीवनामध्ये मी बास्केटबॉल खेळलो होतो, त्या आठवणींना पुन्हा आज उजाळा मिळाला. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा बास्केटबॉल खेळण्याचा आनंद लुटता आला,’ असे अश्विन म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.