ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू मेगन शटच्या घरी एका छोट्या परीचे आगमन झाले आहे. तिने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिली. तिची जोडीदार जेस होलोकने एका मुलीला जन्म दिला आहे. रायली लुईस शट असे या नव्या पाहुणीचे नाव आहे.

मेगनने सांगितले, ”रायलीचा जन्म १७ ऑगस्ट रोजी रात्री १०च्या सुमारास झाला.” मेगनने २०१९मध्ये तिच्या तिची मैत्रीण जेस होलोएकशी लग्न केले. या वर्षी मे महिन्यात मेगनने तिच्या जोडीदाराच्या गर्भधारणेविषयीही माहिती दिली. ती तिच्या पार्टनर जेससोबतचे फोटो सोशल मीडियावर अनेक वेळा पोस्ट करत असते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Megan Schutt (@megan_schutt3)

हेही वाचा – विराटच्या संघात दाखल झाला सिंगापूरचा क्रिकेटपटू, हेड कोचनं दिला राजीनामा!

२८ वर्षीय मेगनने सांगितले की, तिच्या मुलीचा जन्म आपत्कालीन सी-सेक्शनद्वारे झाला आहे. तिने तिच्या जोडीदाराचे कौतुक केले आणि भविष्यात ती किती चांगली आई असेल हे देखील सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेगन म्हणाली, ”आमच्या मुलीचा जन्म सी-सेक्शनद्वारे झाला. या सगळ्याचा एक भाग होणे अविश्वसनीय आहे. मला माझ्या पत्नीबद्दल अभिमान वाटतो. मला माहीत आहे की ती चांगली आई असेल. अशा दोन सुंदर मुली मिळाल्यामुळे मी भाग्यवान आहे.”