पोर्तुगाल व रिअल माद्रिद क्लबचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या खात्यात आणखी एक पुरस्कार जमा झाला आहे. रोनाल्डोला शुक्रवारी ‘ग्लोब सॉकर सर्वोत्तम खेळाडू’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. रोनाल्डोने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने २०११, २०१४ आणि २०१६ साली युरोपियन असोसिएशन फुटबॉल एजंट्स आणि युरोपियन क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा हा पुरस्कार जिंकला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोनाल्डोने या पुरस्कार सोहळ्यात दूर चित्र संवादामार्फत (व्हिडीओ कॉन्फरन्स) उपस्थिती लावली. त्याला इटलीचे अ‍ॅलेझांड्रो डेल पिएरो यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी रोनाल्डोने आणखी वैयक्तिक जेतेपद पटकावण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘माझ्या पुरस्कार संग्रहालयात आणखी जागा शिल्लक आहे. माझ्यासाठी हा आनंददायी क्षण आहे. रिअल माद्रिद, प्रशिक्षक आणि संघसहकाऱ्यांचे आभार,’ अशी प्रतिक्रिया रोनाल्डोने दिली.  यंदाच्या सर्वोत्तम क्लबचा पुरस्कार रिअल माद्रिदने, तर सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार झिनेदिन झिदान यांनी पटकावला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cristiano ronaldo wins globe soccer awards player of the year
First published on: 30-12-2017 at 02:12 IST