क्रिकेट या खेळात कायम खेळाडूची गुणवत्ता पाहिली जाते. पण पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूला सापत्न वागणूक दिली गेल्याचा गौप्यस्फोट रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने केला होता. पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हा हिंदू खेळाडू होता. तो हिंदू आहे, म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला, असे अख्तरने सांगितले. त्यानंतर दानिश कनेरिया यानेही आपल्याबाबत घडलेल्या गोष्टी सांगून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे दाद मागितली, पण त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून काहीही उत्तर मिळालेले नाही, असे त्याने सांगितले. केवळ हिंदू असल्याने त्याला न्यायापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप त्याने केला होता. त्यानंतर आता त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर नवा आरोप केला आहे.

Coronavirus : क्रीडाविश्व शोकाकुल! माजी क्रिकेटपटूची करोनाशी झुंज अपयशी

दानिश कनेरियाने ट्विट करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर त्याला सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याच्याबाबत एक ट्विट केले होते. त्यावर दानिशने रिप्लाय दिला. “ब्रायन लारा एक उत्तम क्रिकेटपटू होता. मी ब्रायन लाराला माझ्या कारकिर्दीत पाच वेळा बाद केले आहे. जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मला पुरेसं सहकार्य केलं असतं, तर मी अनेक मोठे मोठे विक्रम मोडीत काढले असते”, असे ट्विट त्याने केले आहे.

“मोदी सरकार म्हणजे…”; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

या आधीही पाक क्रिकेट बोर्डावर केले होते आरोप

“मी हिंदू असल्याने माझ्यावरील अन्यायाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अद्यापही झोपलेले आहे. देवाला माझी दया आली तर बरं होईल. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी यात लक्षात घालावं. सगळ्यांना न्याय मिळतो, मग मला का नाही? PCB ला पाठवलेले पत्र त्यांचे मला आलेले उत्तर मी लवकरच येथे शेअर करेन. मी बोर्डाकडे माझे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. मला क्रिकेट संघात घेत नसाल तर किमान मला प्रशिक्षक म्हणून काम करण्याची परवानगी द्यावी असे मी पत्रात लिहिले होते पण त्यावर त्यांचे नकारात्मक उत्तर आले, असे त्याने ट्विट केले होते.