अल्लू अर्जुनच्या गाण्यावर वॉर्नर दांपत्याचा डान्स सुरु असतानाच लेक मध्ये आली अन्…

पाहा पोट धरून हसायला लावणारा धमाल VIDEO

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचंही त्याला वेड आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करतानाचा त्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत त्याने लेकीसोबत शीला की जवानी गाण्यावर डान्स केला होता. त्यात त्याची लेक त्याच्यासोबत होती. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने एक झकास व्हिडीओदेखील शूट केला. या व्हिडीओत त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि वॉर्नरची पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करताना दिसले.

‘शंभर नंबरी’ हिटमॅन! क्रिकेट इतिहासात सर्वात आधी रोहितने केला होता ‘हा’ पराक्रम

डेव्हिड वॉर्नरने आता आपलं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुन याच्या एका चित्रपटातील गाण्यावर डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडी यांनी रोमँटिक डान्स केला आहे. अल्लू अर्जुनच्या बुट्टाबोम्मा या गाण्यावर त्यांनी डान्स केला. पण महत्त्वाचं म्हणजे तो डान्स सुरू असताना वॉर्नरची लेक फ्रेममध्ये आली आणि तिनेदेखील डान्स करायला सुरूवात केली.

Video : रोहितने ‘मुंबई इंडियन्स’विरूद्ध घेतली होती हॅटट्रिक

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

It’s tiktok time #buttabomma get out of your comfort zone people lol @candywarner1

A post shared by David Warner (@davidwarner31) on

HBD Rohit : मुंबई इंडियन्सने लाडक्या ‘हिटमॅन’ला दिल्या हटके शुभेच्छा

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नर टिकटॉकवर आल्यापासून रोज नवनवीन व्हिडीओ अपलोड करत आहे. वॉर्नरने आधी टिकटॉक व्हिडीओवर एक टाईमपास व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यानंतर एक फोटो स्टोरीवर पोस्ट केला. महत्त्वाचे म्हणजे त्या फोटोत संघाचा गणवेश त्याच्या पत्नीने घातला असून त्याने पत्नीचा स्विमसुट घातला आहे. यामागचं कारण त्याने सांगितलं नाहीये. केवळ टाइमपास म्हणून त्याने हा फोटो पोस्ट केला होता.

HBD Rohit : WC2019 मध्ये हिटमॅन ठरला होता ‘जगात भारी’

तसेच या आधी वॉर्नरने ‘शीला की जवानी’ या गाण्यावर डान्स करून टिक टॉकवर पदार्पण केले होते. ‘शीला की जवानी’नंतर पुन्हा डेव्हिड वॉर्नरचा सहकुटुंब, सहपरिवार डान्स व्हिडीओ फॅन्सच्या पसंतीस उतरला. वॉर्नरने एक झकास व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओत त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि वॉर्नरची पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करताना दिसले. डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच टिकटॉक अकाऊंट सुरु केलं होतं. आपले व्हिडीओ सध्या तो तिथे पोस्ट करतो आहे आणि ते व्हिडीओ इन्स्टाग्रावर पण शेअर करतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: David warner and wife romantic dance on allu arjun buttabomma song while daughter comes in between watch video vjb