हॉकी इंडिया लीगच्या दुसऱ्या पर्वाला शनिवारपासून मोहालीत सुरुवात होणार असून जेपी पंजाब वॉरियर्स आणि दिल्ली वेव्हरायडर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेत विजेत्याला अडीच तर उपविजेत्याला दीड कोटी रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. त्यामुळे विजयी सुरुवात करण्याकडे पंजाब आणि दिल्ली संघाचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या पंजाबचे नेतृत्व जेमी ड्वायरकडे सोपवण्यात आले असून त्यांच्या संघात संदीप सिंग, शिवेंद्र सिंग, भरत छेत्री, गगनप्रीत सिंग या भारताच्या अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघात रुपिंदरपाल सिंग, युवराज वाल्मीकी, दानिश मुज्तबा, राजपाल सिंग, अर्जुन हलप्पा हे खेळाडू आहेत.