राष्ट्रीय फुटबॉल शिबिरात अनुपस्थित राहिल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने रोमिओ फर्नाडिझ व मंदार राव देसाई यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविण्यात आली आहे. महासंघाने या दोन्ही खेळाडूंना नोटिसीला उत्तर देण्यासाठी एक आठवडय़ाची मुदत दिली आहे. महासंघाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अनुपस्थितीबद्दल खेळाडूंवर दंडात्मक व अन्य कारवाई करण्यापूर्वी या खेळाडूंना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. हे दोन्ही खेळाडू इंडियन सुपरलीग स्पर्धेत गोव्याच्या डेम्पो क्लबकडून सहभागी झाले होते. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच त्यांना केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांनी शिबिरात आपली उपस्थिती नोंदविलेली नाही. या खेळाडूंकडून समाधानकारक खुलासा आला नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2015 रोजी प्रकाशित
फुटबॉल शिबिरातील अनुपस्थितीबद्दल, फर्नान्डेझ, देसाई यांना नोटीस
महासंघाने या दोन्ही खेळाडूंना नोटिसीला उत्तर देण्यासाठी एक आठवडय़ाची मुदत दिली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-12-2015 at 04:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desai get notice