Dhanashree Verma Breaks Silence on Divorce with Yuzvendra Chahal: भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरून होता. यादरम्यान दोघांचा २०२५ मध्ये घटस्फोट झाला. दोघांनी २०२०मध्ये लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वीच चहलने त्यांच्या घटस्फोटाबाबत वक्तव्य केलं होतं. यानंतर आता धनश्री वर्माने त्यांच्या घटस्फोटाबाबत आणि चहलने घातलेल्या त्या टीशर्टबाबत वक्तव्य केलं आहे.
धनश्री वर्मा आणि चहल घटस्फोटाच्या अखेरच्या सुनावणीसाठी कोर्टात जाताना-येतानाचे फोटो, व्हीडिओ व्हायरल झाले होते. चहल जाताना जॅकेट घालून गेला होता, पण येताना मात्र त्याने जॅकेट काढलं होतं आणि त्या काळ्या रंगाची टीशर्टवर “Be Your Own Sugar Daddy” असं लिहिलं होतं. यामुळे चर्चांना मोठं उधाण आलं होतं. धनश्रीने यावर आता वक्तव्य करत तिची बाजू मांडली आहे.
चहलने पोडकास्टमध्ये खुलासा केला होता की, धनश्रीला शेवटचा मेसेज देण्याची त्याची ही पद्धत होती. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत धनश्रीने तिने आपली बाजू मांडली आहे. धनश्रीने सांगितलं की या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तिला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंग, अफवांचा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही.
धनश्री वर्माने युझवेंद्र चहलबरोबर घटस्फोटबाबत पहिल्यांदाच केलं वक्तव्य
धनश्री म्हणाली, “तो (चहल) पहिला बाहेर गेला आणि टी-शर्ट प्रकरण घडलं. मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती कारण मी तेव्हा आतमध्ये होती. मी मागच्या दरवाजाने बाहेर गेली कारण मला मीडियासमोर यायचं नव्हतं. मी साधी जीन्स आणि टीशर्ट घातलं होतं.”
“मी माझ्या कारमध्ये बसली आणि फोन पाहिला. नेमकं काय घडलंय हे मला कळण्याआधीच त्या टीशर्ट स्टंटमुळे लोकांनी माझ्यावर संशय घ्यायला सुरूवात केली. मला असं झालं याने खरंच असं केलंय. तेव्हा मी म्हटलं बस्स, आता संपलंय सगळं. मला कुठेतरी याबाबत वाईट वाटलं. मीच का रडत बसलीये. जाऊदे हे सगळं संपवूया. त्या घटनेमुळे मला पुढे जायला अधिक बळ मिळालं.”
धनश्री शेवटी म्हणाली, “अरे भाई व्हॉट्सअप करायचा होता मेसेज, टी-शर्टवर कशाला लिहायचं” आणि मस्करीवर नेत अखेरीस ती हसली.