Dhanashree Verma On Divorce: यावर्षी सर्वात चर्चेत राहिलेलं प्रकरण म्हणजे भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आणि अभिनेत्री धनश्री वर्मा यांचं घटस्फोटाचं प्रकरण. आधी या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटानंतर चहल आपलं मत व्यक्त करताना दिसून आला होता. पण धनश्रीने कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं. आता ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना तिने आपल्या मनात नेमकं काय सुरू होतं, याबाबत खुलासा केला आहे.
घटस्फोटाबाबत बोलताना धनश्री म्हणाली, ” मला अजूनही आठवतंय, जेव्हा मी तिथे उभी होती आणि निकाल येणारच होता. पुढे काय होणार याची मानसिकदृष्ट्या इतकी तयारी केली असली तरीदेखील ते इतकं भावनिक होतं. मी अक्षरशः सर्वांसमोर रडू लागले. त्यावेळी मला नेमकं काय वाटत होतं, हे मी व्यक्तही करू शकत नव्हते. तो (चहल) आधीच न्यायालयातून निघून गेला होता.” असं धनश्री म्हणाली.
चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे माध्यमांनीही तुफान गर्दी केली होती. तिने न्यायालयातून बाहेर पडत असतानाचाही अनुभव सांगितला. मुख्य प्रवेशद्वारावर तुफान गर्दी होती. त्यामुळे धनश्री आपल्या मैत्रिणीसह मागच्या दाराने बाहेर पडली. याबाबत बोलताना ती म्हणाली,” मला ते मुळीच आवडत नव्हतं. मी आणि माझी मैत्रीण आम्ही मागच्या दाराने बाहेर पडलो. आम्हाला काहीच प्रतिक्रिया द्यायची नव्हती. ते खूप दु:खद होते.”
चहलने काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना मोठे खुलासे केले होते. आता धनश्रीने देखील या प्रकरणात मोठे खुलासे केले आहेत. धनश्री म्हणाली, “घटस्फोट हा एक परिपक्वतेने घेतलेला निर्णय असतो. मी कधीच कुटुंबाची मानहानी होईल असं वागले नाही. महिलांना नेहमीच नातं टिकवण्याची जबाबदारी शिकवली जाते, त्यामुळे जेव्हा नातं मोडतं तेव्हा त्याचा दोष स्त्रीवरच टाकला जातो.”
धनश्री वर्मा ही डान्सर, कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. कोरोना काळ सुरू असताना चहल आणि धनश्रीची भेट झाली होती. चहलने डान्स शिकण्यासाठी धनश्रीशी संपर्क केला. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. चहलने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली होती. दोघेही २२ डिसेंबर २०२० मध्ये विवाह बंधनात अडकले होते. दोघेही ५ वर्ष एकत्र राहिले. पण २०२५ मध्ये दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगली. अखेर मार्च २०२५ मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.