दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध सुरु असलेल्या ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत अखेरच्या दोन सामन्यांसाठी शिखर धवनची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. विजय शंकरला अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो शेवटच्या दोन वन-डे सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये.

विश्वचषक स्पर्धेत शिखर धवन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर फेकला गेला होता. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत शिखरने भारतीय संघात पुनरागमन केलं. मात्र ३ टी-२० सामन्यांत २७ आणि २ वन-डे सामन्यात शिखर केवळ ३८ धावा करु शकला. त्यामुळे आपला गमावलेला फॉर्म परत मिळवण्याची शिखर धवनकडे चांगली संधी आहे.

विजय शंकरलाही विश्वचषक स्पर्धेत दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. यानंतर बीसीसीआयने आफ्रिका अ संघाविरुद्ध वन-डे मालिकेत त्याची भारत अ संघात निवड केली. मात्र या मालिकेतही दुखापतीमुळे विजय शंकरला आपलं स्थान गमवावं लागलं आहे.

अखेरच्या दोन वन-डे सामन्यांसाठी असा असेल भारत अ संघ –

श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंह, रिकी भुई, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, इशान पोरेल