फिनिशर म्हणून ओळख असलेला भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक सध्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतोय. आयपीएलमध्ये दाखवलेल्या धडाकेबाज खेळामुळे त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळत असताना त्याने एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला असून फोटोला खास कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा >>> “…तर आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान ठरू शकतो चॅम्पियन,” विरेंद्र सेहवागचे महत्त्वाचे विधान

दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००४ साली पदार्पण केले. काही कारणांमुळे त्याला संघातील आपले स्थान गमवावे लागले. मात्र हार न मानता त्याने मेहनत घेत पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवले. मागील काही महिन्यांपासून तो चांगलाच फॉर्ममध्ये आहे. याच कारणामुळे आशिया चषक स्पर्धेसाठी त्याचा भारतीय संघाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, आशिया चषक स्पर्धा सुरू असताना त्याने २००४ सालातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो इतर भारतीय खेळाडूंसोबत दिसत आहे. “अनेक वर्षे उलटून गेली. मात्र भारतासाठी खेळताना अजूनही ती विशेष भावना जिवंत आहे,” असे दिनेशने या फोटोंसोबत लिहिले आहे.

हेही वाचा >>> …तरीही सुरेश रैना जगभरात खेळणार क्रिकेट, निवृत्तीच्या घोषणेनंतर नवी माहिती समोर, जाणून घ्या नेमकं कसं?

दरम्यान, सध्या आशिया चषक स्पर्धेमध्ये त्याला दोन सामन्यांत संधी देण्यात आली. यातील एका सामन्यात भारताचा डाव संपल्यामुळे त्याला फक्त एक चेंडू खेळता आला. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संधी देण्यात आली. असे असताना आज (६ सप्टेंबर) रोजीच्या भारत-श्रीलंका सामन्यात त्याला संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.