सध्या आशिया चषक स्पर्धेची धूम आहे. यूएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये सुपर-४ फेरीतील सामने खेळवले जात आहेत.४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने केलेल्या पराभवामुळे टीम इंडियासमोर ‘करो या मरो’ची स्थिती निर्माण झाली आहे. आज (६सप्टेंबर) भारत-श्रीलंका या सामन्यात भारताला विजय मिळवणे गरजेचे आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. हीच बाब लक्षात घेऊन भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने मोठे विधान केले आहे. आशिय चषक स्पर्धेत पाकिस्तान जेतेपद पटकावू शकतो, असा अंदाज सेहवागने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> …तरीही सुरेश रैना जगभरात खेळणार क्रिकेट, निवृत्तीच्या घोषणेनंतर नवी माहिती समोर, जाणून घ्या नेमकं कसं?

क्रिकबझ या क्रीडाविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने याबाबत माहिती दिली आहे. “आणखी एका सामन्यात पराभव झाल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्तानने एक सामना जिंकलेला आहे तर एकात त्यांचा पराभव झालेला आहे. आणखी एक सामना जिंकला तर पाकिस्तान थेट अंतिम फेरीत धडक मारेल. भारतासमोर ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. त्यामुळे भारतावर सध्या दबाव आहे,” असे सेहवाग म्हणाला.

हेही वाचा >>> भारत विरुद्ध श्रीलंका : टीम इंडियासमोर ‘करो या मरो’ची स्थिती; सर्वोत्कृष्ट Playing 11 साठी आहेत ‘हे’ तीन पर्याय

“हे सर्व गणित जुळून आले तर पाकिस्तान बऱ्याच वर्षानंतर अतिंम फेरीत खेळणारा संघ असेल. तसेच या संघाने बऱ्याच वर्षांनी भारतालाही पराभूत केलेले आहे. हे पाकिस्तानचे वर्ष असू शकते,” असेही विरेंद्र सेहवाग म्हणाला.

हेही वाचा >>> Asia Cup 2022 : भारतापुढे ‘करो या मरो’ची स्थिती; आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेवर विजय हवाच; जाणून घ्या नेमकं गणित

दरम्यान, गुणतालिकेचा विचार करायचा झाला तर पाकिस्तान संघ अव्वल दोन संघांमध्ये आहे. पाकिस्तान आणखी दोन सामने खेळणार आहे. या सामन्यांपैकी पाकिस्तानचा एकजरी सामन्यात विजय झाला, तर हा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. तर भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे बंधनकारक आहे. भारताची ६ सप्टेंबर रोजी श्रीलंका तर ८ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरोधात लढत होईल.