प्रत्येक देश सध्या करोनाविरोधात आपापल्या परीने झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रम करत आहेत. क्रीडा विश्वालाही करोनाचा दणका बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सर्व क्रिकेटपटू लाईव्ह चॅटचा आधार घेत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स यांनी लाईव्ह चॅटमार्फत एकमेकांशी आणि चाहत्यांशी संवाद साधला. यात बोलताना “विराटवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही”, असे डीव्हिलियर्स म्हणाला.

IPL Flashback : रसलने आजच ठोकल्या होत्या ४० चेंडूत ८० धावा, पाहा VIDEO

डीव्हिलियर्स विराटशी बोलताना म्हणाला, “तुला एक खूप मजेशीर गोष्ट सांगतो. मी तुझ्याबद्दल (आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक) मार्क बाऊचरकडून खूप ऐकलं होतं. तू १८-१९ व्या वर्षी बंगळुरूकडून खेळायला सुरूवात केलीस. त्यावेळी बाऊचर तुझ्या संघात होता. मी तुला तीन वर्षांपासून ओळखत होतो, पण आपली कधी भेट झाली नव्हती. जेव्हा आपण एखाद्याला पहिल्यांचा भेटतो, तेव्हा आपण हातचे राखून गप्पा मारतो. मला आठवतंय की जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो होतो, पण तेव्हा माझ्या मनात असं सुरू होतं की या माणसावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही…”

सर्वोत्तम आजी-माजी फलंदाज कोण? वॉर्नर-विल्यमसन यांनी दिलं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…पण मला तुला ओळखायला जास्त वेळ लागला नाही. तू एक चांगला माणूस आहेस, हे मी लगेच ओळखलं होतं. सुदैवाने इतर अनेक क्रिकेटपटूंनीदेखील तुझ्यातील माणूसकी ओळखली. जर तसं झालं नसतं, तर इतर खेळाडूंना तुझ्याबरोबर खेळायला फारशी मजा आली असती, असं मला वाटत नाही”, असेही डिव्हिलियर्सने सांगितले.

याशिवाय, या दोघांनी इतर विषयांवरही चर्चा केली. त्यात युजवेंद्र चहलचे टिकटॉक व्हिडीओ पाहण्याचा सल्ला विराटने हसत-हसत डीव्हिलियर्सला दिला.