कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने इंग्लंडचा तडाखेबंद फलंदाज केव्हिन पीटरसनच्या  कारकिर्दीला संजीवनी दिली आणि त्याने इंग्लंडच्या संघात पुनरागमन केले. पण जेव्हा हाच पीटरसन अपेक्षापूर्ती करताना दिसला नाही, तेव्हा कुकनेच संघबांधणी करताना त्याचा विचार केला नाही. ‘‘कुकला सहकार्य आणि त्याची अपेक्षापूर्ती न केल्याने पीटरसनला वगळण्या निर्णय घेण्यात आला,’’ असा खुलासा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) केला आहे.
‘‘केव्हिनने गेल्या दशकभरात चांगला खेळ करीत देशाची सेवा केली आहे. गेल्या दशकभरात त्याचासारखा धडाकेबाज फलंदाज इंग्लंडला मिळाला नाही. पण कर्णधार आणि खेळाडूंना सहकार्य करणे, त्यांची अपेक्षापूर्ती करणे हे केव्हिनला जमले नाही. कुकने आम्हाला जी माहिती दिली त्यानुसार आगामी स्पर्धासाठी त्याचा विचार न करण्याचे ठरवले,’’ असे इसीबीमधील एका प्रवक्त्याने सांगितले.