ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. त्यामुळे पेले यांचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचू लागले आहेत. जिथे पेले नोव्हेंबरपासून दाखल आहेत. पेले यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली असून, त्यामुळे त्यांच्या हृदय आणि मूत्रपिंडावर परिणाम झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितले की पेलेचा कर्करोग पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे तीन वेळच्या विश्वचषक विजेत्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेले यांचे कुटुंबीय पोहोचले रुग्णालयात –

पेले यांचा मुलगा एडसन चोल्बी नॅसिमेंटो शस्त्रक्रियेसाठी आला आहे. त्याला एडिन्हो म्हणूनही ओळखले जाते. सॅंटोसचा माजी गोलकीपर एडिन्होनेही वडिलांचा हात धरल्याचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की, ‘पापा… तुम्ही माझी ताकद आहात.’ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पेले यांचे ऑपरेशन झाले होते. ज्यामध्ये त्यांचा कोलन ट्यूमर काढण्यात आला होता.

नियमित तपासणीसाठी आले होते रुग्णालयात –

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पेले यांचे ऑपरेशन झाले होते. ज्यामध्ये त्यांचा कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. दरवेळेप्रमाणेच यावेळीही ते नियमित तपासणीसाठी आले होते. त्यानंतर त्याची गाठ काढण्यात आली. पेले यांना हृदयाचा त्रास होता आणि त्यांच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनी चिंता व्यक्त केली. त्याच्या केमोथेरपीचे उपचार चांगले परिणाम देत नव्हते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑपरेशननंतर तो इतर अवयवांमध्येही पसरला होता की नाही हे त्याच्या कुटुंबीयांनी किंवा डॉक्टरांनी सांगितले नव्हते.

हेही वाचा – PAK vs NZ 1st Test: बाबर आझम बनला पाकिस्तानचा रन मशीन; शतक झळकावताच रचले विक्रमांचे मनोरे

ब्राझीलला बनवले होते तीन वेळा चॅम्पियन –

ब्राझीलच्या महान खेळाडूने आपल्या देशाला तीन वेळा चॅम्पियन बनवले होते. त्यांनी १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये आपल्या देशासाठी विश्वचषक जिंकला. १९५८ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने सुदानविरुद्ध आणखी दोन गोल केले होते. पेलेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत १३६३ सामन्यांमध्ये १२८१ गोल केले. त्याने ब्राझीलसाठी ७७ गोल केले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Edson cholbi nascimento posted on instagram that legendary footballer pele is in critical condition vbm
First published on: 26-12-2022 at 18:24 IST