ब्राझीलमधील साओ पावलो फुटबॉलप्रेमींच्या क्लबवर धाड घालून सशस्त्र लोकांनी आठ प्रेक्षकांना (चाहत्यांना) ठार केले. हल्लेखोरांचा सध्या बंद करण्यात आलेल्या तुरुंगाच्या गुंड टोळीशी संबंध आहे, असे ब्राझीलच्या पोलिसांनी सांगितले.
शनिवारी मध्यरात्री तीन सशस्त्र दरोडेखोर हे ‘पाविलहाव ९’ हा कॉर्निथन प्रेक्षक गट जेथे जमतो, त्या महामार्गावर दबा धरून बसले होते. त्यांनी या चाहत्यांना डोके खाली करायला सांगितले व सात जणांना गोळ्या घालून ठार केले. आठव्या चाहत्यालाही गोळ्या घातल्या होत्या, पण त्याचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. गुप्तहेर अरलिंदो जोस नेग्राव यांनी चाहत्यांच्या दोन गटांत चकमक झाल्याचा इन्कार केला व हल्ल्यामागे काय हेतू असावा हेही उघड केले नाही, कारण त्यामुळे चौकशीत अडथळा येईल, असे त्यांचे म्हणणे होते.
साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची चौकशी केली जात आहे, पण फुटबॉल चाहत्यांच्या वैमनस्यातून हे घडल्याचा नेग्राव यांनी पत्रकार परिषदेत इन्कार केला. ‘‘आम्हाला संशयित माहिती आहे. कॉर्निथियन व पामेराज या दोन संघांत रविवारी सामना होणार होता, त्यासाठी पाविलहाव-९ हा फुटबॉल शौकिनांचा गट ध्वज तयार करीत होता. पाविलहाव-९ हा कॉर्निथियन चाहत्यांचा गट ब्राझीलमधील कारनडिरू तुरुंगातील कैद्यांशी खेळणाऱ्या चाहत्यांनी स्थापन केला होता. यापूर्वी अशा हत्याकांडात १११ जण मारले गेले व आता तो तुरुंगामध्ये बंद आहे,’’ असे ते म्हणाले.
कॉर्निथियन संघाने या घटनेबाबत प्रतिसाद दिलेला नाही, पण फेसबुकवर संघाचे माजी अध्यक्ष अँड्रेझ सांचेझ यांनी दु:ख व्यक्त केले. ब्राझीलमध्ये फुटबॉलशी निगडित जो हिंसाचार होतो तो फॅन क्लबशी संबंधित असतो, कारण त्या लोकांचे अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांशी संबंध असतात. गेल्या वर्षी कॉर्निथियन क्लबच्या सदस्यांनी संघाच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता.