जगातल्या सर्वात वृद्ध महिला क्रिकेटपटू अशी ओळख असलेल्या इंग्लंडच्या एलिन अॅश यांनी आज वयाच्या १०७ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. १९११ साली अॅश यांचा जन्म झाला, यानंतर १९३७ साली त्यांनी इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. गेली ३० वर्ष एलिन नियमीत योगासनं करत आहेत. आजच्या खास दिवशी आयसीसीने एलिन यांचा योगासनं करतानाचा व्हिडीओ ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात अॅश यांनी ७ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधीत्व केलं. या सामन्यांमध्ये अॅश यांनी २३ च्या सरासरीने १० बळीही घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eileen ash the oldest living test cricketer turns 107 today
First published on: 30-10-2018 at 20:11 IST