आफ्रिकेच्या मार्गात इंग्लंडचा अडथळा

शनिवारी सायंकाळी उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी ते बलाढ्य इंग्लंडला मोठ्या फरकाने धूळ चारू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ, ही ओळख पुसण्यासाठी उत्सुक असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात अनपेक्षित कामगिरी केली आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी ते बलाढ्य इंग्लंडला मोठ्या फरकाने धूळ चारू शकणार का, हे पाहणे रंजक ठरेल. त्यामुळे शनिवारी पराभवाची नामुष्की ओढवली तरी त्यामधील अंतर मोठे नसेल, याकडे फक्त इंग्लंडला लक्ष द्यवे लागेल. चार सामन्यांत तीन विषयांचे सहा गुण नावावर असलेल्या आफ्रिकेला मात्र इंग्लंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्याबरोबरच अन्य लढतीत ऑस्ट्रेलिया पराभूत व्हावी, यासाठी साकडे घालावे लागणार आहेत.ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघात जोस बटलर, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो असे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज असून मोईन अली, आदिल रशीद या फिरकीपटूंची जोडी त्यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. टायमल मिल्स मात्र दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर गेल्याने इंग्लंडला याचा फटका बसू शकतो.आफ्रिकेसाठी कर्णधार तेम्बा बव्हूमा, क्विंटन डीकॉक,  रासी व्हॅन दर दुसेन आणि एडिन मार्करम हे फलंदाज महत्त्वाचे असून डेव्हिड मिलर अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए यांची वेगवान जोडी आणि तबरेझ शम्सी, केशव महाराज हे फिरकीपटू इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवू शकतात.

वेळ : सायंकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोट्र्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: England obstacle in the way of africa unexpected performance in the twenty20 world cup akp

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या