एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम इंग्लंडच्या खात्यावर जमा झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५० षटकांमध्ये ३ गडींच्या मोबदल्यात ४४४ धावा केल्या आहेत. जॉस बटलने ५१ चेंडूत नाबाद ९० धावांची तुफानी खेळी केल्याने इंग्लंडला हा पल्ला गाठता आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॉटींगहॅममध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना रंगला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सलामीची जोडी अवघ्या ३३ धावांवर फोडण्यात पाकिस्तानी गोलंदाजांना यश आले. पण त्यानंतर ऍडम हेल्स आणि जो रुट या जोडीने पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. हेल्सने १७१ तर रुटने ८५ धावा केल्या. या जोडीने दुस-या विकेटसाठी २४८ धावांची भागीदारी रचली. हेल्स आणि रुट बाद झाल्यावर जोस बटलरने मॉर्गनच्या साथीने तुफानी फटके बाजी केली. बटलरने ९० तर मॉर्गने नाबाद ५७ धावा केल्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केली. शेवटच्या १० षटकांमध्ये या जोडीने तब्बल १२३ धावा चोपून काढल्यात. या आधारे इंग्लंडने ५० षटकांत ४ गडींच्या मोबदल्यात ४४४ धावा केल्या. वहाब रियाज हा पाकिस्तानतर्फे महागडा गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांमध्ये ११० धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही.

इंग्लंडने केलेल्या ४४४ धावा या एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. यापूर्वी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. श्रीलंकेने नेदरलँडविरुद्ध खेळताना २००६ मध्ये ५० षटकांत ९ गडी गमावत ४४३ धावा केल्या होत्या.  यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. आफ्रिकेने तीन वेळा ४३५ पेक्षा अधिक धावा केल्यात. आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध ४३९ तर ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध ४३८ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आफ्रिकेने धावांचा पाठलाग करुन हा पल्ला गाठला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England register the highest ever odi score
First published on: 30-08-2016 at 22:45 IST