इंग्लंडमध्ये ‘या’ गोलंदाजाचा सामना करणं कठीण – अजिंक्य रहाणे

सोशल मीडियावर व्यक्त केलं मत

अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य हिस्सा आहे. मधल्या फळीत भारताचा महत्वाचा फलंदाज या नात्याने अजिंक्य अद्याप कसोटी संघातलं स्थान टिकवून आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये अजिंक्यला जागा मिळवता आलेली नसली, तरीही कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवतोय. गेल्या काही मालिकांमध्ये गरजेच्या वेळी अजिंक्यची खेळी आश्वासक राहिलेली आहे. आतापर्यंत अजिंक्यने अनेक दिग्गज गोलंदाजांचा सामना केला आहे. मात्र इंग्लंडमध्ये खेळत असताना जेम्स अँडरसनचा सामना करणं कठीण असतं असं अजिंक्यने म्हटलंय. Indian Oil कंपनीने सोशल मीडियावर आयोजित केलेल्या एका लाईव्ह चॅटमध्ये तो बोलत होता. अजिंक्य Indian Oil कंपनीचा कर्मचारी आहे.

अवश्य वाचा – लॉकडाउन झालेले शास्त्री गुरुजी म्हणतात, या जगात शाश्वत काहीच नाही !

“इंग्लंडमध्ये जेम्स अँडरसनचा सामना करणं अत्यंत कठीण असतं. त्याला तिकडील खेळपट्ट्यांचा आणि हवामानाचा अचूक अंदाज आहे. त्यामुळे माझ्यासाठी अँडरसन हा एकमेव गोलंदाज आहे ज्याचा इंग्लंडमध्ये सामना करणं कठीण आहे”, अजिंक्यने आपलं मत मांडलं. कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेची भारताबाहेरची कामगिरी चांगली राहिलेली आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये त्याच्या नावावर शतकाची नोंद आहे. भारतात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.

दरम्यान भारतासह जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही. भारतातही महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेलं असलं तरीही काही भागात लोकं नियम मोडून रस्त्यावर येत असताना दिसत आहेत. दरम्यान या विषाणूवर अद्याप ठोस औषध मिळालेलं नाही, त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण कधी मिळवलं जाईल हे सांगणं कठीण होऊन बसलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facing james anderson in england is tough says ajinkya rahane psd

ताज्या बातम्या