6 डिसेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास सुरुवात करेल. या दौऱ्यासाठी भारतीय संघाने ऋषभ पंत आणि पार्थिव पटेल या दोन यष्टीरक्षकांना संघात जागा दिली आहे. पार्थिवने 2018 सालात आफ्रिका दौऱ्यात कसोटी सामन्यात यष्टीरक्षण केलं होतं. यानंतर इंग्लंड दौऱ्यात ऋषभ पंतने काही सामन्यात भारताकडून यष्टीरक्षण केलं. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभ पंत ऐवजी पार्थिव पटेलला यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी, भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी केली आहे.

“ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये घाईने फटके खेळतो, त्यामुळे अनेकदा तो लवकर बाद होतो. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठी फटकेबाजी करण्याची गरज नसते. खेळपट्टीवर स्थिरावणंही तितकचं गरजेचं असतं. पार्थिव आता वयाच्या पस्तीशीत असला तरीही तो फिट आहे. ऋषभ वन-डे क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी आणि यष्टीरक्षण करु शकतो.” फारुख इंजिनीअर एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.

अवश्य वाचा – लोकेश राहुल स्वतःला बाद करण्याच्या नवीन पद्धती शोधतोय; सहायक प्रशिक्षक संजय बांगर नाराज

काळानुरुप क्रिकेट बदललं आहे. मात्र आताच्या काळात यष्टीरक्षकांचं फलंदाजीकडे अधिक लक्ष असतं. तुम्ही 200 धावा केल्यात आणि यष्टीरक्षणादरम्यान महत्वाचा झेल सोडलात तर तो झेल 200 धावांच्या बरोबरीचा असतो. आमच्या काळात यष्टीरक्षकांचं पहिलं काम हे चांगलं यष्टीरक्षण करण्याकडे असायचं. इंजिनीअर यांनी भारताच्या सध्याच्या यष्टीरक्षकांच्या मानसिकतेवर आपली नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – IND vs AUS : उमेश यादवची दौऱ्याची सुरुवात पाय घसरून….