इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय वेगवान गोलंदाज व्हर्नन फिलँडरने जाहीर केला. डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केलने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती पत्करल्यामुळे फिलँडरच्या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला आणखी एक धक्का बसला आहे.
३४ वर्षीय फिलँडरने ६० कसोटी, ३० एकदिवसीय आणि ७ ट्वेन्टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २२.१६च्या धावसरासरीने २१६ बळी मिळवले आहेत. ‘‘जानेवारी २०२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेअंती वेगवान गोलंदाज व्हर्नन फिलँडर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे,’’ असे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.