फिफाचा महाघोटाळा ही नामुष्की आहे. त्यामुळे फुटबॉलची प्रतिमा मलिन झालेली नाही, असे उद्गार महान फुटबॉलपटू पेले यांनी काढले.
‘‘फिफामध्ये संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार झाला आहे. मैदानावर काहीही घडलेले नाही. त्यामुळे खेळाच्या प्रतिमेला धोका नाही,’’ असे पेले यांनी सांगितले.
‘‘महाघोटाळा निश्चितच लाजिरवाणा आहे. मात्र भ्रष्टाचार आणि फुटबॉल यांची सांगड घालणे योग्य नाही. महाघोटाळ्यामुळे फिफावर चहूबाजूंनी टीका होते आहे. त्यांच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. मात्र फुटबॉलला मिळालेल्या लोकप्रियतेत फिफाचे योगदान मोठे आहे. ते नाकारुन चालणार नाही. फुटबॉल आणि माणसांचा आदर करणाऱ्या माणसाने फिफाचे अध्यक्षपद भूषवावे. अध्यक्ष एकटा काहीच करू शकत नाही. त्याने सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करावी,’’ असे त्यांनी सांगितले.