scorecardresearch

FIFA WC 2022: पोर्तुगाल-उरुग्वे सामन्यादरम्यान एक व्यक्ती अचानक मैदानात घुसला आणि…दिला जगाला अनोखा संदेश

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातील पोर्तुगाल-उरुग्वे सामन्यादरम्यान एक व्यक्ती थेट मैदानात घुसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

FIFA WC 2022: पोर्तुगाल-उरुग्वे सामन्यादरम्यान एक व्यक्ती अचानक मैदानात घुसला आणि…दिला जगाला अनोखा संदेश
सौजन्य- (लोकसत्ता ग्राफिक्स)

कतारमध्ये फिफा विश्वचषक २०२२ सुरू होण्यापूर्वीच समलैंगिकतेचा मुद्दा कायम चर्चेत आहे. कतारमध्ये समलैंगिकता कायदे कठोर आहेत आणि अनेक खेळाडूंनी म्हटले आहे की ते एलजीबीटीक्यू समुदायाच्या निषेधाचा भाग असतील. कतारमध्ये समलैंगिकता हा गुन्हा मानला जातो. येथे षंढांनाही वैद्यकीय उपचाराद्वारे सामान्य महिला किंवा पुरुष बनविण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच वेळी, इतर देशांमध्ये समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, फिफा विश्वचषकात पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्याने एलजीबीटीक्यू समुदायाचा झेंडा हातात घेऊन मैदानात प्रवेश केला. यानंतर अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडून त्याच्याकडून ध्वज हिसकावून घेतला. तत्पूर्वी, कतारी अधिकार्‍यांनी ब्राझिलियन चाहत्यांकडून त्यांचा ध्वज काढून घेतला कारण त्यांना वाटत होते की हा LGBTQ समुदायाचा ध्वज आहे. मात्र, नंतर याप्रकरणी अधिकाऱ्यांनाही माफी मागावी लागली.

पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यातील सामन्यात LGBTQ समुदायाचा झेंडा घेऊन मैदानात प्रवेश करणारा चाहता. त्याने खास टी-शर्टही घातला होता. या टी-शर्टवर सुपरमॅनचा लोगो होता आणि युक्रेन वाचवा असे लिहिले होते. या प्रकरणावर फारसा गदारोळ झाला नसला तरी कतारमध्ये समलैंगिकतेच्या कायद्याला विरोध निश्चितच नोंदवला गेला.

हेही वाचा :   FIFA WC 2022: “असं करण्याची हिम्मत…” मेक्सिकन बॉक्सरने सेलिब्रेशनमध्ये गुंग असलेल्या मेस्सीला दिली धमकी

या सामन्यात पोर्तुगालने उरुग्वेचा २-० असा पराभव करत २०१८ सालच्या पराभवाचा बदला घेतला. पोर्तुगालचे दोन्ही गोल ब्रुनो फर्नांडिसने केले. त्याने सामन्याच्या ५४व्या मिनिटाला पहिला गोल केला आणि दुसऱ्या हाफच्या दुखापती वेळेत दुसरा गोल केला. मात्र, त्याची हॅटट्रिक पूर्ण करण्यात तो हुकला. त्याचा एक प्रयत्न फसला. चेंडू गोलपोस्टला लागला आणि बाहेर गेला.

हेही वाचा :   BCCI selection committee: बीसीसीआय निवड समितीच्या प्रमुख पदांसाठी अनेक माजी भारतीय दिग्गजांनी केले अर्ज

काय प्रकरण आहे?

कतारमध्ये शरिया कायद्यानुसार समलैंगिकता हा गुन्हा आहे. कोणत्याही समलैंगिक क्रियाकलापात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. या शिक्षेत सात जणांचा तुरुंगवास ते दगडाने ठेचून ठार मारण्याच्या शिक्षेचाही समावेश आहे. कतारमध्ये विवाहबाह्य शारीरिक संबंधांनाही कठोर शिक्षा दिली जाते. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे समलिंगी लोकांना पकडून एका खोलीत बंद केले जाते आणि थेरपीच्या माध्यमातून नपुंसकांना सामान्य महिला किंवा पुरुष बनवण्याचाही प्रयत्न केला जातो.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 12:04 IST

संबंधित बातम्या