व्होक्सवॉगन पोलो चषक मोटार रेस अजिंक्यपद स्पर्धांच्या मालिकेतील अंतिम फेरी एक व दोन डिसेंबर रोजी नोएडा येथील फॉम्र्युला वन ट्रॅकवर होणार आहे. या फेरीत अजिंक्यपद मिळवित चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स होण्याची संधी मुंबईच्या अमेय वालावलकर याला मिळाली आहे.
व्होक्सव्ॉगन इंडिया कंपनीच्या मोटार स्पोर्ट्स विभागाचे प्रमुख पृथ्वीराज सिद्दप्पा यांनी येथे ही माहिती दिली. ते म्हणाले,की स्पर्धेद्वारे खेळाडूंना फॉम्र्युला वन ट्रॅकवर शर्यतीची संधी मिळाली असल्यामुळे अतिशय उत्साहाने ते या शर्यतीत सहभागी झाले आहेत.
वालावलकर याने ३८४ गुणांसह आघाडी स्थान राखले आहे तर संदीपकुमार हा ३०७ गुणांसह त्याच्याखालोखाल आहे. राहिल नुराणी (३०१), औदुंबर हेडे (२७७), सौरव बंडोपाध्याय (२३७) हे खेळाडूही विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.