Women’s Premier League 2024 Updates : महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम २३ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. डब्ल्यूपीएल २०२४ ची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि गेल्या हंगामातील उपविजेते दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील चुरशीच्या सामन्याने होईल. या दोन संघांमध्ये डब्ल्यूपीएल लीगच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामनाही खेळला गेला होता. आता पुन्हा एकदा हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा चुरशीचा सामना तुम्ही कधी, कुठे आणि कसा लाइव्ह पाहू शकता? ते जाणून घेऊयात.

कितीला सामना सुरु होणार?

शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी, डब्ल्यूपीएल २०२४ चा पहिला सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. याआधी बीसीसीआयतर्फे संध्याकाळी साडेसहा वाजता उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आपली परफॉर्फ करताना दिसणार आहेत.

rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी

फोनवर लाइव्ह कुठे बघता येणार सामना?

महिला प्रीमियर लीग २०२४ चे सर्व सामने जिओ सिनेमा ॲपवर थेट प्रक्षेपित केले जातील. तुम्हाला येथे सर्व सामने मोफत पाहता येतील. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही डब्ल्यूपीएल २०२४ सहज पाहू शकता. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील चुरशीचा सामना देखील फक्त जिओ सिनेमा ॲपवर थेट प्रसारित केला जाईल.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : रांची कसोटीत पाऊस व्यत्यय आणणार? जाणून घ्या पाच दिवसांच्या हवामानाची माहिती

टीव्हीवर कुठे बघता येणार सामना?

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दुसऱ्या सत्रातील पहिला सामना संपूर्ण कुटुंबासह स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर थेट पाहू शकता. स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये या सामन्याचा आनंद घेऊ शकता.

हेही वाचा – IPL 2024 : आयपीएलच्या सलामीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनी- विराट कोहली आमनेसामने, २१ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

लॅपटॉपवर देखील विनामूल्य सामने बघता येणार –

महिला प्रीमियर लीग २०२४ चे सामने फोन आणि टीव्ही तसेच लॅपटॉपवर विनामूल्य पाहता येतात. हा सामना लॅपटॉपवर लाइव्ह पाहण्यासाठी तुम्हाला जिओ सिनेमाच्या वेबसाइटवर जाऊन लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर पहिल्या सामन्याचा तसेच डब्ल्यूपीएल २०२४ च्या उद्घाटन सोहळ्याचा आनंद घेऊ शकाल.