scorecardresearch

Premium

Flashback 2022: धक्कादायक एक्झिट! ‘या’ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेक दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप

Year Ender 2022: क्रिकेट जगतातील पाच दिग्गजांनी या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यातील काहींचा निरोप हा मनाला चटका लावून जाणारा होता.

Cricket Players Death in 2022
२०२२ मध्ये जगाचा निरोप घेतलेले खेळाडू

Cricket Players Who Died in 2022 Flashback: २०२२ हे वर्ष वेगाने पुढे सरकत गेले. हे वर्ष क्रिकेट जगतासाठी अनेक आनंदाच्या गोष्टी घेऊन आले पण त्याचबरोबर निराशाजनक आणि दुःखद घटनाही घडल्या आहेत. क्रिकेट जगतातील पाच दिग्गजांनी या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यातील काहींचा निरोप हा मनाला चटका लावून जाणारा होता. या वर्षी काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या, त्यापैकी ऑस्ट्रेलियात खेळलेला टी२० विश्वचषक महत्त्वाचा होता.

मोठ्या घटनांच्या दृष्टीने २०२२ हे वर्ष भारतासाठी वाईट ठरले. या सगळ्या दरम्यान अशा घटना समोर आल्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चार दिग्गजांचा या जगाचा निरोप घेतला, ज्यांना आपण आज स्मरण करणार आहोत. स्वप्नात देखील चाहत्यांनी असा विचार केला नसेल की एवढ्या लवकर आपले लाडके खेळाडू हे जग सोडून जातील.

Celebrity Cricket Turns Fight Angry Actors Producers Beat Each Other Six Injures Actress Spotted Crying Video Make Cricket Fans Mad
सेलिब्रिटी क्रिकेटच्या मैदानात गदारोळ; कलाकारांची हाणामारी, अभिनेत्री रडली.. Video पाहून लोकांचा संताप
World Cup 2023: Ashwin's duplicate rejects the offer Kangaroos who is Mahesh Pithiya refused to train with Australia
World Cup 2023: अश्विनच्या डुप्लिकेटने कांगारूंच्या मनसुब्यांवर फिरवले पाणी, कोण आहे ‘हा’ खेळाडू ज्याने ऑस्ट्रेलियाबरोबर सरावास दिला नकार?
Asian Games 2023: Shooting team aims for gold India gets first gold in Asian Games by breaking China's world record
Asian Games 2023 India Gold: गोल्डन बॉईज! नेमबाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद, चीनचा विश्वविक्रम मोडून शेतकऱ्याच्या पोराने केली ऐतिहासिक कामगिरी
Samit Dravid: Amazing work of Rahul Dravid's son Samit included in Karnataka team for Vinoo Mankad Trophy
Rahul Dravid’s son: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ज्युनिअर द्रविडची शानदार कामगिरी, अंडर-१९ संघात झाली निवड

शेन वॉर्न (क्रिकेटर, ऑस्ट्रेलिया)

क्रिकेट जगतातील दिग्गज लेगस्पिनर आणि अनुभवी खेळाडू शेन वॉर्नची ओळख करून देण्याची गरज नाही. जागतिक क्रिकेटमधलं ते नावाजलेलं नाव आहे. यावर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. वॉर्नचे वय हे जाण्याचे नव्हते पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. शेन वॉर्न ४ मार्च २०२२ रोजी थायलंडमधील व्हिलामध्ये तो उपचार घेत होता. तिथे त्याला हृदयविकाराच्या झटका आला आणि तो त्याच्या लाडक्या चाहत्यांना कायमचा हे जग सोडून निघून गेला. त्याच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेट जगतात हळहळ व्यक्ती झाली.

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर सहित वॉर्नच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला आणि तो आता या जगात नाही यावर काही दिवस तर विश्वासचं बसत नव्हता. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० हून अधिक बळी घेणाऱ्या या दिग्गज खेळाडूचे जाणे क्रिकेट जगतासाठी खूप मोठे नुकसान आहे. शेन वॉर्नने वयाच्या ५२ व्या वर्षी चाहत्यांना रडवले.

हेही वाचा:   IND vs BAN: बांगलदेशच्या कर्णधाराला पडली मेस्सीची भुरळ! दुसऱ्या कसोटीपूर्वी अर्जेंटिनाची जर्सी घालून केला सराव

अँड्र्यू सायमंड्स (क्रिकेटर, ऑस्ट्रेलिया)

शेन वॉर्न प्रमाणेच क्रिकेट जगतातील आणखी एक तारा निखळला. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या अँड्र्यू सायमंड्स या माजी खेळाडूचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. सायमंड्स ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले येथे कार चालवत होता. कारचा अपघात इतका भीषण होता की त्याला त्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेईपर्यंत त्याने या जगाचा निरोप घेतला होता. डॉक्टरांनी त्याला त्याचवेळी मृत घोषित केले होते कारण दुखापत ही खूप गंभीर स्वरुपाची होती. त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले पण ते सर्व प्रयत्न अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा दिग्गज यावर्षी आपल्या सर्वांना सोडून गेला. सायमंड्सचे १४ मे २०२२ रोजी वयाच्या ४६व्या वर्षी अपघाती निधन झाले.

दक्षिण आफ्रिका पंच रुडी कोर्टझेन

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या रुडी कोर्टझेनची अनुभवी पंचांमध्ये गणना होते. ते दीर्घकाळ आयसीसी एलिट पॅनलचे पंचही होते. यावर्षी ९ ऑगस्ट रोजी तो केपटाऊनहून परत येत होते, त्यावेळी त्यांची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. टक्कर इतकी भीषण होती की कोर्टझेनचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोल्फ खेळून ते परत येत असताना त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, ते ७३ वर्षांचे होते.

हेही वाचा:   Kapil Dev: “केले की दुकान लगाओ या अंडे बेचो जा के”, आयपीएलमध्ये खेळण्याच्या ‘दबावा’वर कपिल देव यांची वादग्रस्त टिप्पणी

असद रौफ (पंच, पाकिस्तान)

आयसीसीच्या एलिट पॅनेलचा भाग असलेले पाकिस्तानी पंच असद रौफ वयाच्या यांचे ६६ व्या वर्षी १४ सप्टेंबर बुधवारी लाहोरमध्ये निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आले. मृत्यूपूर्वी ते दुकान बंद करून घरी जात होते, पण अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते वाचू शकले नाहीत. रौफ २००६ ते २०१३ पर्यंत आयसीसी एलिट अंपायर पॅनलचा सदस्य होते. मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये बीसीसीआयने रौफला भ्रष्टाचारात दोषी ठरवले होते. त्यामुळे त्याच्यावर पाच वर्षांची क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात पाकिस्तानी अंपायर औपचारिकपणे आरोपी असल्याचे आढळले होते.

अंबाप्रतापसिंहजी जडेजा (पूर्व रणजी खेळाडू)

भारतीय क्रिकेटने आपला एक माजी क्रिकेटपटू यावर्षी गमावला. वास्तविक भारताचे माजी क्रिकेटपटू अंबाप्रतसिंहजी जडेजा यांचे जानेवारी महिन्यात ४ तारखेला कोविड-१९ संसर्गाने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. जामनगरचे रहिवासी अंबाप्रतापसिंहजी जडेजा हे मध्यमगती वेगवान गोलंदाज आणि फलंदाज होते. रणजी ट्रॉफीमध्ये ते सौराष्ट्रकडून आठ सामने खेळले. ते गुजरात पोलिमध्ये निवृत्त डीएसपी होते. जडेजा यांनी आठ रणजी सामन्यांमध्ये ११.११ च्या सरासरीने १०० धावा केल्या. त्याच वेळी, गोलंदाजीत, त्याने १७ च्या सरासरीने १० विकेट घेतल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flashback 2022 shocking exit this year many legends from international cricket bid farewell to the world avw

First published on: 21-12-2022 at 11:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×