स्कॉट डिसुझा या २६ वर्षीय युवा खेळाडूचा फुटबॉलच्या मैदानावर खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील सेंट सेबॅस्टियन शाळेच्या मैदानावर दादरमधील पीस हेवन सोसायटीमधील रहिवासी असणारा स्कॉट नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळण्यासाठी आला होता. मात्र खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याबरोबरच तो मैदानावर कोसळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्याला डॉक्टरांनी लगेचच मृत घोषित करण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Footballer dies while playing abn
First published on: 31-10-2020 at 00:16 IST