भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाला गोव्यातील एका गावात कचरा टाकल्याबद्दल ५००० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उत्तर गोव्यातील अल्डोना या नयनरम्य गावात जडेजाचा बंगला आहे. या गावातील सरपंच तृप्ती बांदोडकर यांनी जडेजाला हा दंड आकारला. ९०च्या दशकातील लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणून नाव कमावलेल्या जडेजाने हा दंड भरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरपंच बांदोडकर म्हणाल्या, ”गावात कचर्‍याच्या प्रश्नामुळे आम्ही त्रस्त आहोत. बाहेरून कचरा गावात टाकला जातो, म्हणून आम्ही काही तरुणांना कचरा पिशव्या गोळा करण्यासाठी आणि दोषींना ओळखण्यासाठी नेमले आहे. आम्हाला एका कचरा पिशवीत अजय जडेजाच्या नावाचे बिल सापडले.”

हेही वाचा – Euro Cup 2020 : आज इंग्लंड वि. जर्मनी आणि स्वीडन वि. युक्रेन आमनेसामने

”भविष्यात आम्ही त्यांना गावात कचरा टाकू नका, असे सांगितले असता, ते दंड भरण्यास तयार झाले. त्यांनी दंड भरला. आम्हाला अभिमान आहे, की असे व्यक्तिमत्व, एक लोकप्रिय क्रिकेट खेळाडू, आमच्या गावात राहतात, परंतु अशा लोकांनी या गोष्टींचे पालन केले पाहिजे”, असेही तृप्ती बांदोडकर यांनी सांगितले.

अजय जडेजा यांच्यासोबत लेखक अमिताभ घोष यांचेही अल्डोना गावात घर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cricketer ajay jadeja fined rs 5000 for throwing garbage in goa adn
First published on: 29-06-2021 at 15:51 IST