पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने गौप्यस्फोट करत फक्त हिंदू असल्या कारणाने दानिश कनेरिया याला संघातील इतर खेळाडूंकडून वाईट वागणूक दिली जात होती असा खुलासा केला होता. शोएब अख्तरने केलेल्या या दाव्यावर आता खुद्द दानिशने खुलासा केला असून हे सर्व सत्य असून पाकिस्तान संघात आपल्यासोबत भेदभाव करण्यात आल्याचं सांगितलं आहे. शोएब अख्तरने हा खुलासा केल्याबद्दल दानिशने त्याचे आभार मानले असून त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी असल्याचा दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शोएब अख्तरने सत्य सांगितलं आहे. मी हिंदू आहे म्हणून माझ्याशी न बोलणाऱ्या सर्व खेळाडूंची नावे मी जाहीर करणार. याआधी या विषयावर बोलण्याची हिंमत माझ्यात नव्हती, पण आता मी बोलणार,” असं दानिशने एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते असा खुलासा केला होता. पाकिस्तानी संघात कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेण्याच्या यादीत दानिश चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तानी क्रिकेट संघात स्थान मिळवणारा दुसरा हिंदू धर्मीय खेळाडू आहे. याआधी अनिल दलपत पाकिस्तानी संघाकडून खेळले आहेत.

शोएब अख्तरने या विषयावर भाष्य केल्याने आता आपल्याला धैर्य मिळालं असून लवकरच त्या सर्व खेळाडूंची ज्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली त्यांची नावं जाहीर करणार असल्याचं दानिशने जाहीर केलं आहे. यावेळी त्याने एकीकडे संघात काही खेळाडू दुजाभाव करत असताना युनिस खान, इंजमाम, मोहम्मद युसूफ, शोएब अख्तर यांच्यासारखे खेळाडू आपल्या धर्माची चिंता न करता चांगली वागणूक द्यायचे असंही सांगितलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former pakistan spinner danish kaneria hindu shoaib akhtar sgy
First published on: 27-12-2019 at 10:29 IST