IPL 2024 Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Score : आयपीएल २०२४ च्या ४८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने आले होते. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी निसटता विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सने मार्कस स्टॉइनिसच्या निर्णायक ६२ धावांच्या जोरावर १९.२ षटकांत ६ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केले

Live Updates

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Highlights: आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघात ५ सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये लखनऊ सुपरजायंट्सचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. कारण लखनऊने ४ सामने जिंकले असून मुंबईने फक्त १ सामना जिंकला आहे.

23:33 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊचा मुंबईवर ४ विकेट्सनी रोमहर्षक विजय, मार्कस स्टॉइनिसचे निर्णायक अर्धशतक

लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १४४ धावा केल्या. यादरम्यान इशान किशनने ३२ धावा केल्या. नेहल वढेराने ४६ धावा केल्या. टीम डेव्हिडने ३५ धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान लखनऊकडून मोहसीन खानने २ विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई, स्टॉइनिस, नवीन आणि मयंक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौच्या संघाने १९.२ षटकांत ६ गडी गमावून सामना जिंकला. स्टॉइनिसने त्यासाठी जोरदार कामगिरी केली. त्याने ६२ धावा केल्या. केएल राहुलने २८ धावांची खेळी केली.

23:19 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊला सहावा धक्का, बडोनी ६ धावा करून बाद

लखनऊ सुपर जायंट्सची सहावी विकेट पडली. आयुष बडोनी धावा करून बाद झाला. आता क्रुणाल पांड्या फलंदाजीसाठी आला आहे.

23:12 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊला पाचवा धक्का, टर्नर ५ धावा करून बाद

लखनऊची पाचवी विकेट पडली. ॲश्टन टर्नर ५ धावा करून बाद झाला. कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लखनऊने १७.१ षटकात १२३ धावा केल्या आहेत. आता आयुष बडोनी फलंदाजीसाठी आला आहे.

23:06 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊला विजयासाठी २४ चेंडूत २३ धावांची गरज

लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी २४ चेंडूत २३ धावांची गरज आहे. संघाने १६ षटकांत ४ गडी गमावून १२२ धावा केल्या आहेत. ॲश्टन टर्नर ४ धावा करून खेळत आहे. पुरनही ४ धावा करून खेळत आहे.

22:59 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊला चौथा धक्का, स्टॉइनिस ६२ धावा करून बाद

या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार पुनरागमन केले आहे. लखनऊची मोठी विकेट पडली. मार्कस स्टॉइनिस ६२ धावा करून बाद झाला. मोहम्मद नबीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लखनऊने १५ षटकात ११६ धावा केल्या आहेत. संघाने ४ विकेट गमावल्या आहेत.

22:54 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : स्टॉइनिस अर्धशतक झळकावून खेळत आहे

लखनऊला विजयासाठी ३६ चेंडूत ४२ धावांची गरज आहे. लखनऊने १४ षटकांत ३ गडी गमावून १०३ धावा केल्या आहेत. मार्कस स्टॉइनिस ५१ धावा करून खेळत आहे. निकोलस पुरन 2 धावा करून खेळत आहे.

22:52 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊला तिसरा धक्का, दीपक हुडा बाद

लखनौ सुपर जायंट्सची तिसरी विकेट पडली. दीपक हुडा १८ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लखनऊने १३.१ षटकात ९९ धावा केल्या आहेत.

22:44 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊला विजयासाठी ५४ धावांची गरज

लखनऊला विजयासाठी ४८ चेंडूत ५४ धावांची गरज आहे. स्टॉइनिस अर्धशतकाच्या जवळ आहे. तो ४३ धावा करून खेळत आहे. दीपक हुड्डा १६ धावा करून खेळत आहे. लखनऊने १२ षटकांत २ गडी गमावून ९१ धावा केल्या आहेत.

22:37 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊने १० षटकांत केल्या ७९ धावा

लखनौ सुपर जायंट्सने १० षटकात २ गडी गमावून ७९ धावा केल्या आहेत. स्टॉइनिस ३९ धावा करून खेळत आहे. दीपक हुडा १० धावा करून खेळत आहे. संघाला विजयासाठी ६० चेंडूत ६६ धावांची गरज आहे.

22:24 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : केएल राहुल २८ धावा करून बाद

हार्दिक पंड्याने लखनऊ सुपर जायंट्सला दुसरा धक्का दिला. त्याने केएल राहुलला बाद केले. मोहम्मद नबीने त्याचा झेल सीमारेषेवर घेतला. तो २८ धावा करून परतला. आठ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६१/२ आहे.

22:17 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : कर्णधार राहुलने सावरला लखनऊचा डाव

लखनऊ सुपर जायंट्सने ५ षटकात १ गडी गमावून ४६ धावा केल्या आहेत. केएल राहुल चांगली फलंदाजी करत आहे. त्याने १९ चेंडूत २५ धावा केल्या आहेत. त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला आहे. मार्कस स्टॉइनिस १९ धावा करून खेळत आहे. या दोघांमध्ये ४५ धावांची भागीदारी झाली.

22:08 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : चार षटकानंतर लखनऊची धावसंख्या १ बाद १९

लखनऊ सुपर जायंट्सने ४ षटकात १ गडी गमावून २६ धावा केल्या. केएल राहुल ६ धावा करून खेळत आहे. स्टॉइनिस ९ चेंडूत १८ धावा केल्यानंतर खेळत आहे. लखनऊला विजयासाठी ११९ धावांची गरज आहे.

21:44 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI: मुंबईच्या खात्यात पहिली विकेट

मुंबईने दिलेल्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनऊला नवीन तुषाराने पहिला धक्का दिला. लखनऊकडून अर्शीन कुलकर्णी आणि केएल राहुल फलंदाजीसाठी आले. पदार्पण केलेल्या अर्शीनला पहिल्याच सामन्यात गोल्डन डकवर पायचीत झाला. तुषाराने विकेटसाठी अपील केल्यानंतर इशानसोबत बोलून दोघांनी पंड्याला रिव्ह्यू घेण्यासाठी तयार केले आणि तिसऱ्या पंचांनी अर्शीनला बाद घोषित केले.

21:31 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईने लखनऊला दिले १४५ धावांचे लक्ष्य

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला या सामन्यात काही विशेष करता आले नाही. त्यामुळेच संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १४४ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये २७ धावांवर संघाने चार विकेट गमावल्या. रोहित शर्मा चार, सूर्यकुमार यादव १०, तिलक वर्मा सात आणि हार्दिक पंड्या एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर इशान किशन आणि नेहल वढेरा यांनी पदभार स्वीकारला. दोघांमध्ये ५३ धावांची भागीदारी झाली.

१४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवी बिश्नोईने इशान किशनला मयांक यादवकरवी झेलबाद केले. तो ३२ धावा करून परतला. त्याचवेळी नेहल वढेरा ४६ धावा करण्यात यशस्वी ठरला. त्याला मोहसीन खानने बोल्ड केले. या सामन्यात मोहम्मद नबीने एक धाव केली. तर टीम डेव्हिडने ३५ आणि गेराल्ड कोएत्झीने एक धाव केली. या सामन्यात दोघेही नाबाद राहिले. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात १७ धावा केल्या.

21:17 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईला सातवा धक्का, नबी १ धाव करून बाद

मोहम्मद नबी १ धावा करून बाद झाला. मुंबईची सातवी विकेट पडली. संघाने १८.१ षटकात ७ गडी गमावून १२३ धावा केल्या आहेत.

21:11 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईला बसला सहावा धक्का

मोहसीन खानने मुंबईला सहावा धक्का दिला. त्याने ११२ धावांच्या स्कोअरवर सेट बॅट्समन नेहल वढेराला बोल्ड केले. या सामन्यात वढेरा ४६ धावा करून परतला. सध्या टीम डेव्हिड आणि मोहम्मद नबी क्रीजवर आहेत.

21:04 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईने १५ षटकांत ९६ धावा केल्या

मुंबई इंडियन्सने १५ षटकांत ५ गडी गमावून ९६ धावा केल्या आहेत. वढेरा ३७ धावा करून खेळत आहे. टीम डेव्हिडला अद्याप खाते उघडता आलेले नाही. लखनऊसाठी रवी बिश्नोई, मोहिसन खान, मार्कस स्टॉइनिस आणि नवीन-उल-हक यांनी १-१ विकेट घेतली.

20:54 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईला मोठा धक्का, इशान किशन ३२ धावा करून बाद

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. इशान किशन ३६ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. रवी बिश्नोईने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबई इंडियन्सने १४ षटकांत ५ गडी गमावून ८० धावा केल्या. वढेरा २१ धावा करून खेळत आहे.

20:42 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : इशान-वढेराने सावरला मुंबई इंडियन्सचा डाव

मुंबईसाठी इशान किशन चांगली फलंदाजी करत आहे. त्याने ३० चेंडूत २८ धावा केल्या आहेत. नेहलही डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. तो १३ धावा करून खेळत आहे. या दोघांमध्ये ४१ धावांची भागीदारी आहे. मुंबईने १२ षटकात ६८ धावा केल्या आहेत.

20:39 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईची धावसंख्या ४ बाद ५० धावा

मुंबईची धावसंख्या ५० धावांच्या पुढे गेली आहे. संघाने १० षटकांत ४ गडी गमावून ५७ धावा केल्या आहेत. इशान किशन २१ धावा करून खेळत आहे. वढेरा ९ धावा करून खेळत आहे.

20:27 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईने ९ षटकांत केल्या ४९ धावा

इशान किशन १४ धावा करून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याने १९ चेंडूत १ चौकार मारला आहे. नेहल वढेरा ९ धावा करून खेळत आहे. मुंबईने ९ षटकांत ४ गडी गमावून ४९ धावा केल्या आहेत. लखनऊकडून गोलंदाजी करताना मयंक यादवने २ षटकात १५ धावा दिल्या आहेत. नवीन, मोहसीन आणि स्टोइनिस यांनी १-१विकेट घेतली आहे.

20:17 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये २८ धावा

मुंबई इंडियन्सने ६ षटकांत ४ गडी गमावून २८ धावा केल्या. इशान किशन ५ धावा करून खेळत आहे. नेहल वढेरा १ धाव घेतल्यानंतर खेळत आहे. लखनऊकडून स्टॉइनिस, मोहसीन आणि नवीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

20:07 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : तिलक पाठोपाठ हार्दिकही आऊट

डावाच्या सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तिलक वर्माला रवी बिश्नोईने धावबाद केले. या षटकाच्या पुढच्या चेंडूवर नवीन-उल-हकने हार्दिक पंड्यालाही बाद केले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी तिलकला केवळ सात धावा करता आल्या. इशान किशन सध्या पाच धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. सहा षटकांनंतर संघाची धावसंख्या २८/४ आहे.

20:00 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईच्या खराब सुरुवातीनंतर लखनऊने वाढवला दबाबव

मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ४ षटकात २ गडी गमावून २२ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा ५ चेंडूत २ धावा करून खेळत आहे. इशान किशन ८ चेंडूत ५ धावा करून खेळत आहे. मोहसिन आणि स्टॉइनिस यांनी लखनऊसाटी १-१ विकेट घेतली आहे.

19:52 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : सूर्या १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला

मुंबईला दुसरा धक्का सूर्यकुमार यादवच्या रूपाने बसला. त्याला केवळ १० धावा करता आल्या. मार्कस स्टॉइनिसने त्याला केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजीसाठी आले आहेत. त्याला साथ देण्यासाठी इशान किशन उपस्थित आहे. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या २०/२ आहे.

19:42 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मोहसीन खानने रोहित शर्माला केले झेलबाद

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आहे. मोहसीन खानने रोहित शर्माला बाद केले. रोहित शर्माने ५ चेंडूत ४ धावा केल्या. आता मुंबई इंडियन्सची धावसंख्या १.३ त १ गडी बाद ७ धावा आहे.

19:38 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊसाठी स्टॉइनिसने केली चांगली गोलंदाजी

लखनऊ सुपर जायंट्सने चांगली सुरुवात केली आहे. स्टॉइनिसने पहिल्या षटकात फक्त २ धावा दिल्या आहेत. इशान किशन १ धाव घेतल्यानंतर खेळत आहे. रोहित शर्माला अद्याप खातेही उघडता आलेले नाही. मुंबईने १ षटकानंतर बिनबाद २ धावा केल्या.

19:12 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

लखनt सुपर जायंट्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.

19:07 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : लखनऊचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, अर्शिन कुलकर्णीचे पदार्पण,

लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अर्शिन कुलकर्णी आणि ॲश्टन टर्नर यांना लखनऊ सुपर जायंट्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दोघांना पदार्पण कॅप्स देण्यात आल्या आहेत.

18:33 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : अमित मिश्रा पुन्हा करू शकतो रोहितची शिकार

लखनT सुपर जायंट्सच्या अमित मिश्राविरुद्ध रोहित शर्माचा रेकॉर्ड चांगला नाही. त्याला अमित मिश्राच्या ९२ चेंडूत केवळ ८७ धावा करता आल्या, तर ८ वेळा विकेट गमावली. रोहित शर्माला फक्त सुनील नरेन जास्त वेळा (९ वेळा) पॅव्हेलियनमध्ये पाठवू शकला आहे.

18:05 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : आयपीएलच्या १७व्या हंगामातील दोन्ही संघाची कामगिरी

आयपीएलच्या १७व्या हंगामात आतापर्यंत मुंबईचा संघ ९ सामन्यांत ३ विजय आणि ६ पराभवांसह गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे. लखनऊचा संघ ९ सामन्यांत ५ विजय आणि ४ पराभवांसह ५ व्या स्थानावर आहे.

17:41 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : आतापर्यंत मुंबईवर राहिलेय लखनऊचे वर्चस्व

मुंबई आणि लखनऊमध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यापैकी लखनौने तीन तर मुंबईने एक सामना जिंकला आहे. गेल्या वर्षी एलिमिनेटरमध्ये मुंबईने लखनऊविरुद्धचा एकमेव सामना जिंकला होता.

17:35 (IST) 30 Apr 2024
LSG vs MI : मुंबईला सूर्यकुमारकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि टी-२० मध्ये नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. या मोसमात बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत अपयशी ठरला आहे.

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Highlights, IPL 2024 : आयपीएलच्या १७व्या हंगामात आतापर्यंत मुंबईचा संघ १० सामन्यांत ३ विजय आणि ६ पराभवांसह गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे. लखनऊ संघाने १० सामन्यांतील ६ विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.